Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देशात लवकरच 10 हजार इलेक्ट्रिक बसेस

देशात लवकरच 10 हजार इलेक्ट्रिक बसेस


नवी दिल्ली, दि. ४ : संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासात केंद्रीय रस्ते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच देशभरात 10 हजार इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावतील, अशी माहिती दिली. प्रदूषण टाळण्याबरोबरच इंधनावरचा खर्च वाचविण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या वापरणे ही काळाची गरज असून मंत्रालयाने त्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. चारचाकी गाड्यांमध्ये पुढे बसणाऱ्या लोकांसाठी एअरबॅग सक्तीची आहे. अपघातावेळी लोकांचा जीव वाचावा, याकरिता मागे बसणाऱ्या लोकांसाठी गाडीत एअरबॅग बसविण्याच्या योजनेवर काम सुरू केले आहे, असेही ते म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.