Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तासगाव शहरात रथोत्सवानिमित्त 1 सप्टेंबरला वाहतूक मार्गात बदल

तासगाव शहरात रथोत्सवानिमित्त 1 सप्टेंबरला वाहतूक मार्गात बदल


सांगली, दि. 30,  : तासगाव शहरात रथोत्सव सालाबादप्रमाणे साजरा होणार आहे. तासगाव येथील पारंपारिक रथोत्सव पाहण्याकरीता जिल्ह्यातून तसेच परजिल्ह्यातून तासगाव शहरामध्ये बहुसंख्य लहान मुले,‍ स्त्रिया, पुरूष गर्दी करीत असतात. कोणतेही वाहन गर्दीत घुसून नागरीकांच्या जिवितास धोका पोहचू नये याकरीता सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये दि. 1 सप्टेंबर 2022 रोजी 00.01 वाजल्यापासून ते 23.59 वाजेपर्यंत खालील मार्गावरील पोलीस वाहने, ॲम्बुलन्स, फायर बिग्रेड या वाहनांखेरीज सर्व वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश दिले आहेत.

सांगली-मणेराजुरी कडून येणारी वाहतूक

 (विटा/आटपाडीकडे जाणारी) - 

(१)  कॉलेज कॉर्नर तासगाव - भिलवडी नाका - एसटी स्टॅण्ड - विटा नाका - विटा. 

(२) कॉलेज कॉर्नर तासगाव - भिलवडी नाका - एसटी स्टॅण्ड - विटा नाका - आटपाडी. विट्याकडून येणारी वाहतूक (सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी ) - विटा - विटा नाका - चिंचणी नाका - चिंचणी चौक - थळेश्वर मंदीर चिंचणी - मणेराजुरी हायवे - कॉलेज कॉर्नर तासगाव - सांगली. आटपाडी कडून येणारी (सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी) - आटपाडी - पुणदी फाटा - वाघमोडे वस्ती चिंचणी -  चिंचणी चौक - थळेश्वर मंदीर चिंचणी - मणेराजुरी हायवे - कॉलेज कॉर्नर तासगाव - सांगली.

पार्कींग पॉईंट - विटा, आटपाडी, चिंचणी कडून येणारे भाविक- कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव (मार्केट यार्ड येथे टू व्हिलर व फोर व्हिलर पार्किंग). सांगली, मणेराजुरी भिलवडी कडून येणाऱ्या भाविकांसाठी फोर व्हिलर पार्किंग व्यवस्था द बुध्दिष्ट सोसायटी कॉलेज कॉर्नर जवळील मैदान व दत्त मंदीर समोरील मैदान येथे  तर टू व्हिलर पार्किंग व्यवस्था क्रिडा संकुल ग्राउंड तासगाव येथे करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंधन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी स्पष्ट केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.