Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्धव ठाकरेंचा फोन आला,म्हणाले. CM शिंदेनी सुरतला जातानाची स्टोरीच सांगितली

 उद्धव ठाकरेंचा फोन आला,म्हणाले. CM शिंदेनी सुरतला जातानाची स्टोरीच सांगितली


काल विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. यावेळी शिंदे सरकारने आपले बहुमत सिद्ध केले. त्यानंतर सभागृहात झालेल्या भाषणांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली. एवढी वर्ष मनात साचलेली शिवसेनेबाबतची खदखद व्यक्त करताना शिंदे यांनी सुरतला जाण्यापासून ते मुख्यमंत्री होईपर्यंतचे अनेक नवनवीन खुलासे केले.

पक्षातील आमदारांवर अन्याय होत होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, अन्यायाविरुद्ध उठाव केला पाहिजे मी देखील तोच उठाव केला असल्याचे शिंदे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. सगळे झोपायचे तेव्हा मी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जायचो आणि सगळे उठण्याच्या आधीच परत यायचो, हा कार्यक्रम एका दिवसात झालेला नसल्याचं देखील शिंदे यांनी सभागृहात स्पष्ट केलं.

मी उठावासाठी निघालो तेव्हा मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोन सुरू झाले. म्हणाले कुठे चाललात ? मी त्यांना सांगितले मला माहिती नाही. माझ्यासोबतच्या एकाही आमदाराने आपण कुठे जात आहोत, काय करणार आहोत हे मला विचारले नाही. सगळ्यांचा माझ्यावर विश्वास होता. शिवसेनेत माझे खच्चीकरण करण्यात आले. सुनील प्रभूंना ते माहिती आहे. मी सच्चा शिवसैनिक आहे, शिवसेना वाचविण्यासाठी लढून शहीद झालो तरी चालेल पण आता माघार नाही असं देखील शिंदेनी यावेळी दरडावून सांगितलं.

फडणवीसांनी सांगितला ED चा अर्थ

विरोधकांकडून सत्तेत गेलेल्या अनेक आमदारांवर इडीमुळे घाबरल्याचे आरोप देखील यावेळी करण्यात आले. विरोधकांच्या ईडीबाबतच्या आरोपाला फडणवीस यांनी सभागृहातच चातुर्याने उत्तर दिलं. आमच्याकडे आलेले लोक ED मुळेच आलेत हे खरं आहे पण ही ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात आरोप प्रत्यारोपांची चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.