Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बॅक, रेल्वे, एल. आय. सी. इत्यादी व तत्सम स्पर्धा परिक्षेच्या पूर्व तयारीकरिता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोंचिग) साठी अर्ज सादर करण्याकरीता मुदतवाढ

बॅक, रेल्वे, एल. आय. सी. इत्यादी व तत्सम स्पर्धा परिक्षेच्या पूर्व तयारीकरिता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोंचिग) साठी अर्ज सादर करण्याकरीता मुदतवाढ


डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षणसंस्था, पुणेमार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यासाठी बँक, रेल्वे, एल.आय.सी इत्यादी व तत्सम नोकरीच्या संधी तसेच Aptitude Test जाणि Interview वर आधारित खाजगी व कॉर्पोरेट क्षेत्रातील चांगल्या नोकरीच्या संधी याकरीता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षाच्या पूर्व तयारी करिता निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंग) महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यामध्ये 30 प्रशिक्षण केंद्रामार्फत (प्रति प्रशिक्षण केंद्र 150 प्रशिक्षणार्थी 1 बॅच याप्रमाणे 6 महिने कालावधी करीता प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या करीता इच्छुक व पात्र उमेदवारांनी संबंधित जिल्ह्यातील केंद्राशी संपर्क साधून त्या कैद्राकडे अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले होते,

महाराष्ट्रातील अनेक जिल्हयामध्ये खुप मोठ्याप्रमाणात पर्जन्यवृष्टी तर अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे वाहतुक व दळण-वळण व्यवस्था विशेषता दुरध्वनी इंटरनेट संविधा, प्राभावित झाल्या याचा विचार करून इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याकरीता मुदतवाढ करण्यात येत आहे.

अंतिम दिनांक दि. जुलै, 20 2022 या ऐवजी पात्र युवक-युवतींनी https://barti.maharashtra.gov.in या वेबसाईट वरून 'Notice Board' च्या सदरखाली बैंक, रेल्वे, एल. आय. सी. | लिंक वरून अर्ज डाऊनलोड करून किंवा नमुद प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयातून प्राप्त करून, ज्या ठिकाणी त्यांना

प्रशिक्षण घ्यावयाचे आहे. त्या केंद्रावर दि. २१ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत परिपूर्ण भरलेल्या अर्ज कागदपत्रासह सादर करावा. सदर योजनेबाबत प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा धोरणात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्यास त्यामध्ये बदल करण्याचे अथवा सदर जाहिरात रद्द करण्याचे सर्व अधिकार महासंचालक, बार्टी पुणे तसेच शासनास राहतील.


जाहिरात/ बॅच क्र.०५/मुदतवाढ आय.बी.पी.एस./२०२२/


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.