Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपी शाहरुख पठाण याच्यावर तुरुंगामध्ये हल्ला

 उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपी शाहरुख पठाण याच्यावर तुरुंगामध्ये हल्ला


अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपी शाहरुख पठाण यांच्यावर आर्थर रोड तुरुंगात हल्ला करण्यात आला आहे. तुरुंगातील पाच कैद्यांनी त्याला मारहाण केल्याचे समजते. शाहरुख पठाण याचे त्याच्याच बराकीतीतील पाच जणांशी वाद झाला होता. त्या वादानंतर त्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या मारहाणी मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषितांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे विविध राज्यांत आगडोंब उसळला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये 54 वर्षांच्या उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी हत्या करण्यात आली. कोल्हे यांनी नुपूर शर्मा हिची पोस्ट शेअर केल्याने त्यांची हत्या केली असावी असा संशय वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी मुदस्सर अहमद आणि शाहरूख पठाण या दोन तरुणांना अटक केली तर नंतर अब्दुल तौफीक, शोएब खान आणि आतिब राशिद यांना अटक केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.