सांगलीतील खूनप्रकरणी रेकॅडर्वरील तरूणाला अटक
पूवीर्च्या वादासह शिविगाळ केल्याने घातला डोक्यात दगड
सांगली : शहरातील विश्रामबाग येथील ८० फुटी रस्ता परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसमोर सोमवारी पहाटे दिलीप प्रभाकर शिरगुडकर (वय ४२, रा. सिद्धेश्वर टॅवर, ८० फुटी रस्ता, विश्रामबाग) याचा डोक्यात दगड घालून निघृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी धनराज गजानन राऊत (वय २६, रा. विश्रामाबाग) याला अटक केली आहे. तो पोलिसांच्या रेकॅडर्वरील गुन्हेगार असून पूवीर्चा वाद आणि मृत दिलीपने शिविगाळ केल्याच्या रागातून त्याने हा खून केल्याची कबुली दिली आहे.
विश्रामबाग येथील ८० फुटी रस्ता परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसमोर एक मृतदेह पडल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर एलसीबी तसेच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी एका बुलेट (एमआरएक्स १४२) पडलेली आढळून आली. दिलीपच्या डोक्यात दगड घातल्याचेही स्पष्ट झाले. यामध्ये त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह सांगली सिव्हीलमध्ये हलवला. घटनेनंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
त्यावेळी मृत दिलीप आणि संशयित धनराज रविवारी रात्री उशीरापयर्त एका बारमध्ये दारू पित बसले होते अशी माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. शहरातील धामणी रस्ता परिसरात तो येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने दिलीपशी पूवीर् झालेला वाद आणि त्याने रात्री केलेल्या शिविगाळीच्या रागातून खून केल्याची कबुली दिली. संशयित धनराज याच्यावर गदीर् मारामारी आणि मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम, उपअधीक्षक अजित टिके यांच्या मागर्दशर्नाखाली विश्रामबागचे पोलिस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, सिकंदर वधर्न, आदिनाथ माने, विलास मुंढे, राहुल क्षीरसागर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.