Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चोरट्यांनी थेट पोलिस मुख्यालयाच्या हद्दीत घुसून पुन्हा एकदा चंदनाच्या झाडांची चोरी केली

चोरट्यांनी थेट पोलिस मुख्यालयाच्या हद्दीत घुसून पुन्हा एकदा चंदनाच्या झाडांची चोरी केली


सांगली : चोरट्यांनी थेट पोलिस मुख्यालयाच्या हद्दीत घुसून पुन्हा एकदा चंदनाच्या झाडांची चोरी केली आहे. काही वर्षांपूर्वी पोलीस अधीक्षकांच्या बंगल्याशेजारी असलेल्या चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. त्यावेळी झाडे चोरीला जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी धाव घेतल्याने चोरट्यांनी चोरलेले बुंधे कुंपनाशेजारी टाकून पळ काढला होता. यावेळी मात्र चोरटे तेथील ट्रॉफीक पार्कमधील दोन झाडांचे बुंधे घेऊन जाण्यात यशस्वी झाले आहेत . या चोरीची नोंद विश्रामबाग पोलिसांत झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी  पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान पोलिस मुख्यालयातील ट्रॉफीक पार्कमधील चंदनाच्या झाडांची चोरी केली आहे.याप्रकरणी पोलिस शिपाई दिपक तुकाराम वडेर यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी संबधित झाडे करवतीने कापली आहेत. त्यानंतर फांद्याकडचा भागही कापून तेथेच टाकला आहे आणि केवळ दोन मोठाले बुंधे घेऊन पोबारा केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे चार हजार रुपये किमतीचे चंदनाच्या झाडांचे दोन बुंधे चोरीला गेल्याची नोंद केली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरिक्षक िअमतकुमार पाटील हे करत आहेत.

घरफोडी, मोबाईल चोरी, वाहन चोरी याबरोबरच धुमस्टाईलने महिलांकडील मौल्यवान ऐवज हिसडा मारुन पळविणार्‍या चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहेत. यात भर म्हणून की काय चोरट्यांनी आता थेट पोलिस मु‘यलयाच्या परिसरात घुसून चंदनाच्या झाडांची चोरी केली आहे. हे एक प्रकारचे चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिल्यासारखेच झाल्याची चर्चा आहे. यापूर्वी चंदन चोरट्यांनी चक्क पोलीस अधीक्षकांच्या बंगल्याच्या कुंपनानजिकचीच चंदनाची झाडे कापली होती. कापलेले मोठाले बुंधे कंपाऊंडच्या भिंतीवरुन बाहेर रस्त्यावर आणले जात असताना चोरट्यांचा सुगावा लागला होता. सहा ते सात चोरटे असल्याचेही दिसले होते. त्यानंतर पोलिसांना आपली चाहुल लागल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी धुम ठोकली होती. आता पुन्हा चोरटे चोवीस तास पोलिसांचा वावर असलेल्या पोलिस मुख्यालय परिसरात घुसून चोरी करत असल्याचे समोर आले आहे. सर्वसामान्य नागरिक व्यायामाच्या निमित्ताने तेथील मैदानाभोवती चकरा मारु लागले की, राखीव असलेले पोलीस नागरिकांना हटकतात आणि या परिसरात फिरायचे नाही, असे बजावतात. पोलीस इतके जागरुक असतानाही चोरट्यांनी संधी कशी साधली ?, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.