शिंदे सरकारचा संजय राऊतांना पहिला दणका...
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत जितेंद्र नवलानी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. ईडीची भीती दाखवून मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याचा आरोप राऊतांनी केले होते. सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच जितेंद्र नवलानी यांना क्लिन चीट मिळाल्याची माहिती समोर आलीये.
सरकारचा शपथविधी होताच अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी या आरोपांत तथ्य नसल्याचे सांगत चौकशीच बंद केली आहे. पोलिसांकडून मुंबई उच्च न्यायालयात याबाबत लेखी माहिती देण्यात आली आहे. न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत नवलानीची प्राथमिक चौकशी रद्द करण्याची याचिका निकाली काढली. नवलानीकडून ईडीच्या काही अधिकाऱ्यांसाठी खंडणी वसूल केल्याचा आरोपही राऊतांनी केला होता. तसेच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचाही त्याच्याशी संबंध असल्याचा दावा राऊतांनी केला होता.
तब्बल 59 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करत हा गुन्हा सुरवातीला आर्थिक गुन्हे शाखा अर्थात EOW कडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ACB नेही गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ठाकरे सरकारने एसआयटीही नेमण्यात आलेली.
जितेंद्र नवलानी हे ईडीचे अधिकारी म्हणून वावरत असून खंडणी उकळत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. गावदेवी येथील पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी नवलानी यांच्या पबवर कारवाई केल्यामुळे डांगे यांना निलंबित करण्यात आलं होतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.