कॉलेज कॉर्नर येथे दुचाकीवरून मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना केली अटक...
कॉलेज कॉर्नर येथे दुचाकीवरून येऊन धूम स्टाईलने मोबाईल हिसडा मारून लंपास करणाऱ्या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. अमन मिरासाब पेंढारी (वय १९ रा गवळी गल्ली) आणि मोहसीन मुस्ताक ठाकर (वय २४ रा. पसायदान कॉलनी, शिवशंभो चौक) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचा एक मोबाईल आणि दुचाकी असा एकूण ४१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी गुरुप्रसाद रवींद्र चव्हाण हे दि. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी कॉलेज कॉर्नर परिसरातून घरी जात होते. यावेळी पल्सर गाडीवरून दोन तरुणांपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने चव्हाण यांच्या हाताला हिसडा देवुन धुम स्टाईल मध्ये मोबाईल चोरून घेवुन गेला होता. तसेच फिर्यादी यांनी त्याचा पाठलाग केला असता ते तेथुन पल्सर गाडीवरून पळुन गेले होते. त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरी प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यानी तपास सुरू केला. सांगली व मिरज शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार यांची पडताळणी सुरू केली. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. यावेळी दरिबा बंडगर व संदिप घस्ते यांना माहिती मिळाली की, दोघेजण हे आपटा चौकी या ठिकाणी चोरीचे मोबाईल विक्री करता येणार आहेत.
मिळालेल्या माहिती प्रमाणे सापळा लावला असता दोन तरूण काळया रंगाच्या पल्सर गाडीवरून येत असल्याचे दिसले त्यांच्या हालाचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना थांबवुन चौकशी केली. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक काळ्या रंगाचा मोबाईल मिळुन आला. सदर मोबाईल बाबत चौकशी केली असता त्यांनी सदरचा मोबाईल गाडीवरून येवुन हिसकावुन चोरला असल्याबाबतचे सांगितले. सदर गुन्हयामध्ये पल्सर गाडी व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, अनिल ऐनापुरे, आदिनाथ माने, विलास मुंढे, दरिबा बंडगर, संदिप घस्ते, महमद मुलाणी यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.