एक नजर बेवारस गॅस माल वाहतूक सिलेंडर ने भरलेल्या रिक्षावर
सांगली विश्रामबाग गणपती मंदिर समोर रस्त्यावर बेवारस गॅस रिक्षा आहे. यामध्ये गॅस सिलेंडर भरलेले आहेत. या रिक्षावर वेलींचा गराडा पडला आहे. खुप दिवसांपासून ही रिक्षा उभी आहे. रस्त्यावर ज्वलनशील पदार्थ असलेली रिक्षा एक कोडे आहे.
गॅस हा ज्वलनशील पदार्थ आहे. या गॅस भरलेल्या रिक्षाकडे ना विश्रामबाग पोलीस, ना बिट मार्शल, ना वाहतूक रायडर, ना स्थानिक गुन्हे अन्वेषण यांचे लक्ष गेले नाही. वास्तविक ही बेवारस रिक्षा कोणाच्या मालकीची आहे, गॅस सिलेंडर टाक्या नक्की कोणी व कशासाठी आणल्या आहेत, चोरीच्या आहेत, हे कोडे उलगडनार की गुलदस्त्यात राहणार !!!!! की एखादी दुर्घटना'''''घडल्यानंतरच " प्रशासन जागे होणार ! ! ! !
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.