Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपा सांगली शहर जिल्हा वतीने ओबीसी आरक्षण मान्य झाल्याने जल्लोष

 भाजपा सांगली शहर जिल्हा वतीने ओबीसी आरक्षण मान्य झाल्याने जल्लोष 


सांगली गुरुवार २१ जुलै : -
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी चे राजकीय आरक्षण मान्य केले असून बुधवारी या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे तसेच यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुका या ओबीसी आरक्षणाला गृहीत धरूनच घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत तसेच राजकीय आरक्षण परत मिळाल्याबद्दल सांगली शहर भाजपाच्या वतीने आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालय समोर जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन न करता मविआ सरकारने केवळ चालढकल केली. सरते शेवटी बांठिया आयोग स्थापन केला  परंतु त्यांना निधी दिला नाही. 


शिंदे-फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयात हा अहवाल स्वीकारला जाईल याची हमी घेतली, म्हणूनच ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मविआ सरकारने गमावलं ते शिंदे-फडणवीस सरकारने मिळवलं. फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाला मिळालेलं आरक्षणही मविआ सरकारने गमावलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाज घटकाला हे कळून चुकलं आहे की शिंदे-फडणवीस सरकारच आपल्याला न्याय देऊ शकतं. देवेंद्रजी जे बोलले ते त्यांनी सत्तेत येताच केवळ २० दिवसात करून दाखवलं. तसेच मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळवून देऊन शिंदे फडणवीस सरकार लवकरच मराठा समाजाला न्याय मिळवून देतील असे आज आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले व ओबीसी बांधवांना आरक्षण देण्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच ओबीसी राजकीय आरक्षण प्राप्त करून देण्याच्या प्रक्रियेतील सहभागी सर्वांचे आभार मानले. 



व मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शिंदे - फडणवीस सरकारच योग्य व सक्षम आहे असा ठाम विश्वास दर्शविला. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, संघटन सरचिटणीस दीपक माने, माजी आमदार नितीनराजे शिंदे, प्रदेश सदस्य शेखर इनामदार, प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे, महिला मोर्चा अध्यक्ष स्वाती शिंदे, माजी महापौर व ओबीसी मोर्चा सचिव संगीता खोत, ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमर पडळकर, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक संजय कुलकर्णी, संजय यमगर, गजानन आलदर, सुब्रावतात्या मद्रासी, राजेंद्र कुंभार, प्रकाश ढंग, युवराज बावडेकर, लक्ष्मण नवलाई, निरंजन आवटी, नगरसेविका सविता मदने, गीतांजली ढोपे पाटील, भारती दिघडे, उर्मिला बेलवलकर, अनारकली कुरणे, प्रीती मोरे, माधुरी वसगडेकर, गीता पवार, सुश्मिता कुलकर्णी, विश्वजित पाटील , सुभाष गडदे, विशाल पवार, दरीबा बंडगर, रवींद्र सदामते, प्रियानंद कांबळे, सुरज पवार, उदय मुळे, केदार खाडिलकर, अमित भोसले, डॉ. भालचंद्र साठे, इम्रान शेख, सुजित राऊत, बाळू बेलवलकर, श्रीकांत वाघमोडे, सागर पाटील, धनेश कातगडे, प्रकाश पाटील, अनिकेत खिलारे, प्रथमेश वैद्य, चंद्रकांत घुनके, अमित गडदे, अमित भोसले, निलेश निकम, प्रफुल्ल ठोकळे, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.