Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मी राजीनामा देऊन निवडणूक लढवायला तयार, फक्त.. ठाकरेंच्या आव्हानाला सत्तारांचं उत्तर

मी राजीनामा देऊन निवडणूक लढवायला तयार, फक्त.. ठाकरेंच्या आव्हानाला सत्तारांचं उत्तर


औरंगाबाद, 24 जुलै : शिवसेना आमदारांच्या बंडानंतर ठाकरे आता मैदानात उतरले आहेत. एकीकडे आदित्य ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांच्या मतदार संघात दौरे काढले जात आहेत.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरेही लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. दरम्यान, बंडखोरी केल्यापासून शिवसेनेकडून गद्दार म्हणून आमदारांवर आरोप केले जात आहेत. आदित्य ठाकरे यांनी तर बंडखोरांना राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावं असं आव्हान दिलं होतं. या आव्हानाला शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलं आहे.

सोबतच आदित्य ठाकरे यांनी उलट आणखी आव्हान दिलंय. आदित्य ठाकरे यांची बंडखोरांवर टीका भिवंडी येथे काढलेल्या दौऱ्यात आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांची गर्दी हेच आमचं यश आहे. हे जे काही सुरु आहे ते क्लिष्ट आहे. ज्यांना आपण ओळख दिली, मंत्रिपद दिलं ते आपल्याला सोडून गेले.

ते योग्य आहे का? त्यांनी गद्दारी केली ते योग्य आहे का? राजकारणाची पातळी सोडायची नसते. ही माणूसकीशी झालेली गद्दारी आहे, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, 'मी लहानपणापासून ज्यांना पाहतोय, त्यांनी आज पाठीत खंजीर खुपसले. मात्र, कुठेही आपली शिवसेना हललेली नाही, ज्यांना अपचन झालं आहे तेच हललेत. त्यांच्यावर विश्वास टाकला, पण तुमच्यावर अन्याय झाला आणि तेच आता निष्ठावाण म्हणून पुढे येत आहेत. राजकारण जमले नाही म्हणून आज हे दिवस आले आहेत.

स्वतःच्या आमदारांवर पाळत आम्ही ठेवली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.' 'माझे वडील चोरायला निघालेत, तुम्ही कसले मर्द, दरोडेखोर आहात', उद्धव ठाकरेंचा घणाघात अब्दुल सत्तार यांचं उत्तर बंडखोर आमदारांनी हिंमत असेल तर राजीनामा देऊन निवडणूक लढवावी, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. यावर सत्तार म्हणाले की मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवायला तयार आहेत. फक्त शिंदे साहेबांनी परवानगी द्यावी. मग कळेल कोण गद्दार आणि काय निष्ठा असते. माझी मातोश्रीवर जायची इच्छा नाही. आदित्य ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी माझ्या मतदार संघात यावे. याआधी आला नव्हता पण आता या, असे आवाहनचं अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.