Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

व्हॉटस अप विकणार मार्क झुकेरबर्ग

व्हॉटस अप विकणार मार्क झुकेरबर्ग


फेसबुकची पेरेंट कंपनी मेटाच्या महसुलात या वर्षी प्रथमच मोठी घट झाली असून त्याचा परिणाम ‘व्हॉटस अप’ वर पडेल असा दावा एक अहवालात केला गेला आहे.  २०२२ च्या दुसर्या वार्षिक अहवालात मेटाच्या महसुलात १ टक्का घट झाल्याचे आणि त्यामुळे २८.८ अब्ज नफा कमी झाल्याचे नमूद केले गेले आहे. पुढचे वर्ष याच प्रकारे असेल असा दावा केला जात आहे.

ब्लुमबर्गच्या अहवालानुसार मेटाने व्हॉटस अप मध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे मात्र त्यातून म्हणावा तसा नफा मिळालेला नाही. अमेरिके व्यतिरिक्त अन्य देशात व्हॉटस अप या इन्स्टन्ट मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर सर्वाधिक होत आहे पण त्यातून इन्स्टाग्राम प्रमाणे मोठा फायदा मिळलेला नाही. आजकाल युवा वर्ग फेसबुक पासून दुरावत चालला असल्याने कंपनीची ग्रोथ कमी झाली आहे. यामुळे मार्क झुकेरबर्ग व्हाँटस अप विकून टाकण्याचा निर्णय घेऊ शकतात असे जाणकार सांगत आहेत.

मार्क झुकेरबर्गने नुकतेच,एका आर्थिक मंदीत प्रवेश केल्यासारखे वाटत आहे,असे वक्तव्य केले होते आणि त्याचा परिणाम डिजिटल जाहिरात व्यवसायावर दिसत असल्याचे म्हटले होते. याच वेळी त्यांनी पुढच्या वर्षात कर्मचारी कपात करण्याचे संकेत दिले होते. सध्या टॉपवर असलेल्या ‘टिक टॉक’ ला टक्कर देण्यासाठी सतत इन्स्टाग्रामवर शॉर्ट व्हिडीओ फिचर अपग्रेड करण्यावर जोर दिला जात असल्याचे समोर आले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.