Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बांग्लादेशी महिलेची गोकुळनगरात विक्री

 बांग्लादेशी महिलेची गोकुळनगरात विक्री


सांगली: नोकरीच्या अमिषाने फसवून आणलेल्या एका तीस वर्षीय बांग्लादेशी महिलेची वेश्याव्यवसायासाठी गोकुळनगरात  विक्रीज्ञकेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबधित महिलेला दि.३० जूनपासून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यासाठी भाग पाडल्याचेही समोर आले असून पिडीत महिलेने विश्रामबाग पोलिसांत धाव घेऊन चार जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

विश्रामबाग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिडीत महिला ही बांग्लादेशाची नागरिक आहे. तिने आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगांची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी संशयीत राधा नामक महिला, महाभुरा भुया ( रा.शेगरेहाट, ठाणा सोनारगंज, जिल्हा नारायणगंज , बांग्लादेश), राजू आणि कालू नामक दोन व्यक्तीं अशा चारजणांच्या विरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यातील कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत संशयीत महाभुरा भुया याने आपल्याला मेडीकल संदर्भात नोकरी देण्याचे अमीष दाखविले. महिन्याला तीस हजार रुपये पगार मिळेल, असे सांगून आपल्याकडे कोणतीही कागदपत्रे नसतानाही बांग्लादेशातून भारतात आणले. त्यानंतर गोकुळनगरमध्ये आणून चाळीस हजार रुपयांना आपली विक्री केली. त्यानंतर राधा नामक महिला, राजू आणि कालू नामक दोन व्यक्ती, अशा तिघांनी आपल्यावर वेश्याव्यवसाय करण्यासाठी दबाव आणला. दि.30 जून ते 15 जुलैंपर्यंत आपल्याला नको असलेल्या व्यवसायात ढकलले होते. पिडीतेची एकुण कैफीयत समोर आल्यानंतर आता पोलिसांनी संशयीतांवर गुन्हा दाखल करुन कारवाईला सुरुवात केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.