Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मक्याचा वायदे बाजारामध्ये समावेश करण्याबाबत २६ जुलै रोजी सांगलीत मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन

मक्याचा वायदे बाजारामध्ये समावेश करण्याबाबत २६ जुलै रोजी सांगलीत मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन


सांगली :
सांगलीतील हळदीसाठीची वायदे बाजार जगप्रसिद्ध असून याचा सांगलीतील व्यापार फार मोठ्या प्रमाणावर वाढण्यासाठी झालेला आहे. हळदीप्रमाणे मक्याचाही वायदे बाजारामध्ये समावेश व्हावा या दृष्टिकोनातून सांगली चेंबर ऑफ कॉमर्स आणि स्पाइस अँड फूड पार्क सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २६ जुलै २०२२ रोजी दुपारी ०४:०० वाजता सांगली चेंबर ऑफ कॉमर्स, मार्केट यार्ड, सांगली येथे मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून एनसीडीएक्सचे वरिष्ठ व्यवस्थापक उत्पादनचे मा. भूपालीनी तसेच मका उत्पादन व्यवस्थापक सांगली जिल्हा दौऱ्यावर येत असून ते याबाबत अधिक मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती स्पाइस अँड फूड पार्कचे अध्यक्ष सुरेश पाटील व सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 

ते म्हणाले, सध्या आपल्याकडे मक्याचे फार मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून त्याचा वायदे बाजारामध्ये समावेश झाला आणि वायद्याप्रमाणे मालाची डिलिव्हरी मिळू लागली तर हा एक नवीन व्यवसाय, उद्योग व्यापाऱ्यांना चालना देणारा ठरणार आहे. तर नवीन मका उत्पादक शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना व्यवसाय वाढीस तसेच नवीन व्यापारी, उद्योजक, गोडाऊनधारक यांना याचा उपयोग होणार आहे व सांगली, महाराष्ट्र व कर्नाटकातील उद्योजकांनाही याचा फायदा होईल. या निमित्ताने सांगलीत व्यापाऱ्यांमध्ये नवीन अध्यायास सुरुवात होऊ शकते. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तरी सदर मार्गदर्शनपर चर्चासत्रास शेतकरी, व्यापारी-उद्योजक, गोडाऊनधारक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आव्हान संयोजकातर्फे करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.