Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सर्व मतदारांनी आपल्या मतदार ओळखपत्रास आधार जोडणी करून घ्यावी. - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सर्व मतदारांनी आपल्या मतदार ओळखपत्रास आधार जोडणी करून घ्यावी. - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


मतदार ओळखपत्रास आधार जोडणीसाठी सक्रिय सहकार्य करा मतदारांकडून स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यासाठी 1 ऑगस्ट पासून कार्यक्रम 


सांगली, दि. 19,  : घरोघरी भेटी देऊन मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्रमांक 6ब व्दारे स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्तीद करण्यात आलेली आहे. दि.  1 ऑगस्ट 2022 रोजी हा कार्यक्रम सुरू होईल. या कार्यक्रमाबाबत जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, मीडिया, एनजीओ आणि सीएसओ यांनी मतदार ओळखपत्रास आधार जोडणीसाठी सक्रिय सहकार्य करावे. तसेच सर्व मतदारांनी आपल्या मतदार ओळखपत्रास आधार जोडणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

भारत निवडणुक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांच्याद्वारा निवडणुक कायदा (सुधारणा)  अधिनियम, २०२१ अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मध्ये सुधारणा केल्या आहेत. यामध्ये कलम 23 नुसार  मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहीती संग्रहित करणे बाबतच्या सुधारणा अंतर्भुत आहेत. आधार क्रमांक मिळवण्याचा उद्देश मतदा र यादीतील त्याच्या नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्यात त्यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करणे हा आहे. त्या आधारे मतदार नोंदणी नियम १९६० मधील नियम 26B मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. या सुधारणांची अंमलबजावणी दि. 1 ऑगस्ट 2022 पासून लागु होणार आहे. दि. 1 एप्रिल 2023 पर्यंत किंवा  तत्पुर्वी मतदार यादीत असलेली प्रत्येक व्यक्तीध त्याचा आधार क्रमांक उपलब्ध करून देऊ शकतो. 

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २३ मधील दुरुस्तीने स्पष्टपणे नमूद केले आहे की विद्यमान मतदारांकडून आधार संकलनाचा उद्देश मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीमच्या नावाची नोंदणी ओळखणे हा आहे. या कार्यक्रमाचा उद्देश कायदेशीर तरतुदीस अनुसरून आहे.तथापि, आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्या वतीने ऐच्छिक आहे असेही आयोगाने स्पष्ट केलेले आहे.

मतदार यादीतील विद्यमान मतदारांनी त्यांचा आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक 6 ब  मध्ये अर्ज मतदार नोंदणी अधिकारी/ सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे सादर करावायाचा आहे. अर्ज क्रमांक 6ब भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावा उपलब्ध असेल. तसेच मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6ब ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल.

भारत निवडणुक आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल/ अँपच्या माध्यमातुन मतदार ऑनलाईन पध्दतीने अर्ज क्रमांक 6ब भरून  आधार क्रमांक नोंदवू शकतो आणि UIDAI कडे नमुद असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त OTP द्वारे आधारचे प्रमाणीकरण करु शकतो. तसेच जर मतदारास स्व-प्रमाणीकरण करावयाचे नसल्यास मतदार त्याचा  स्व-प्रमाणीकरणाशिवाय ऑनलाईन पध्दतीने अर्ज क्र. 6ब भरून त्यासोबत योग्य दस्तावेज सादर करू शकतो. जर मतदाराकडे आधार क्रमांक नसेल आणि त्यामुळे त्याचा/ तिचा आधार क्रमांक सादर करता येत नसेल तर मतदाराला नमुना अर्ज क्रमांक 6ब मध्ये नमूद केलेल्या अकारा पर्यायी कागदपत्रांपैकी कोणत्याही एक दस्तावेज सादर करता येईल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.