ऑटोरिक्षा परवान्यावरील कार्यक्षेत्रात वाढ करण्याकरिता अर्ज केल्यास सांगली जिल्हा क्षेत्राची परवान्यावर नोंद घेण्यात येणार...
सांगली, दि. 6, : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत दि. 18 जुलै 2017 रोजी पूर्वी मंजूर केलेल्या ऑटोरिक्षा परवान्यावरील कार्यक्षेत्रात दुरूस्ती करण्याबाबतच्या प्रस्तावाचे समितीने अवलोकन केले. दि. 18 जुलै 2017 रोजी पूर्वी मंजूर केलेल्या ऑटोरिक्षा परवान्यावरील क्षेत्रात वाढ करण्याकरिता परवानाधारकाने कार्यालयास अर्ज सादर केल्यास मोटर वाहन कायदा 1988 च्या कलम 74 च्या तरतुदीनुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सांगली जिल्हा क्षेत्राची परवान्यावर नोंद घेण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. व्ही. साळी यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.