Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलीस सब इन्स्पेक्टरला बलात्काराच्या आरोपाखाली अटक, नागपुरात खळबळ...

 पोलीस सब इन्स्पेक्टरला बलात्काराच्या आरोपाखाली अटक, नागपुरात खळबळ...


नागपूर : नागपूरमध्ये चक्क एका पोलिसावरच बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. बलात्काराच्या आरोपाखाली या पोलिसाला अटकही करण्यात आली असून प्रदीप कुमार नितवने असं या पोलिसाचं नाव आहे. पोलिस सब इन्स्पेक्टर पदावर काम करणाऱ्या प्रदीपवर बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर संपूर्ण नागपूर पोलीस दलाच एकच खळबळ माजली आहे. 35 वर्षीय प्रदीपने एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी प्रदीप याला अटकही करण्यात आली आहे. 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर प्रदीपने 13 जुलैला चिखलदरा येथे बलात्कार केला, असा आरोप करण्यात आला आहेय. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रदीप कुमार नितवने याला पाच दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे.

नात्यातीलच मुलीवर बलात्कार

नात्यातीलच असलेल्या 17 वर्षांच्या मुलीवर प्रदीपने बलात्कार केला. या मुलीला घेऊन प्रदीप कुमार नितवने चिखलदऱ्याला गेला. तिथे नेवून या मुलीवर त्याने बलात्कार केला, असा आरोप करण्यात आला आहे. ही मुलगी इयत्ता बारावीची विद्यार्थीनी आहे. ती नागपुरात पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. बलात्काराच्या या घटनेनं नागपुरात खळबळ उडाली आहे. पीडित विद्यार्थीनी मूळची सावनेरची असल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार सिताबर्डी पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपी पोलीस उपनिरीक्षक असलेल्या प्रदीप कुमार नितवने याला बेड्या ठोकल्यात. सध्या प्रदीपची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

नेमकं काय घडलं?

प्रदीपकुमान नितवने हा मुलीला फूस लावून चिखलदरा इथं घेऊन गेला होता. कारने तो बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीला घेऊन गेला. तिथे पोहोचल्यानंतर त्याने तिला काही संशयास्पद गोष्ट प्यायला दिली. यानंतर शुद्ध हरपलेल्या अवस्थेत गेलेल्या मुलीवर प्रदीपने अतिप्रसंग केला. अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्यानंतर प्रदीपने मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली. झालेला प्रसंग कुणाला सांगितला तर तुझी खैर नाही, असं म्हणत पीडितेला धमकावण्यात आलं होतं. दरम्यान, पीडितेनं आपल्या पालकांना घडलेली हकीकत सांगितल्यानंतर अखेर सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर आरोपी पीएसआयला अटक करण्यात आली आहे. आता पुढील तपास केला जातोय.





➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.