Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्राह्मण समाजातील उद्योजकांनी आपला ब्रॅन्ड व्हॅल्यू वाढवावा डॉ.राजन श्रीखंडे

ब्राह्मण समाजातील उद्योजकांनी आपला ब्रॅन्ड व्हॅल्यू वाढवावा डॉ.राजन श्रीखंडे 


सांगलीः
ब्राह्मण समाजातील उद्योजकांनी आपला ब्रॅन्ड व्हॅल्यू वाढवावा असे मत चिंतामणराव इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड रिसर्चचे संचालक डॉ.राजन श्रीखंडे यांनी  व्यक्त केले.

ब्राह्मण उद्योजकांचे जागतिक बिझनेस नेटवर्क असणार्‍या बीबीएन ग्लोबल च्यावतीने  सांगली,कोल्हापुर,सातारा,कराड येथील उद्याजकांसाठी आयोजित व्याख्यानात डॉ.श्रीखंडे बोलत होते. 

यावेळी डॉ.श्रीखंडे यांनी ब्रॅन्डिंग,मार्केटींग,अ‍ॅन्ड अ‍ॅडव्हर्टायझिंग या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले,प्रत्येक व्यक्तीचा व्यवसाय हा अन्न,वस्त्र आणि निवारा याच्या निगडित असतो. ब्राह्मण समाजातील उद्योजकांनी स्वतःची ओळख निर्माण करावी,आपल्या व्यवसायाची ओळख व्हावी यासाठी स्वतःचा एक लोगो निर्माण करावा,यासाठी उद्योजकांनी स्वतःच्या व्यवसायाची ब्रॅन्ड व्हॅल्यू वाढवणे आवश्यक आहे.

जिल्हा समन्वयक संदीप नाईक,बीबीएनजी चे चाप्टर हेड विश्‍वेश फडणीस , जॉईट सेक्रेटरी शशांक शेंडे,प्रविण गोडबोले,संयोजक धनंजय गाडगीळ आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन कल्याणी गाडगीळ यांनी केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.