Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्तार अब्बास नक्वी यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा दिला राजीनामा

 मुख्तार अब्बास नक्वी यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा दिला राजीनामा


भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट बैठकीत मुख्तार अब्बास नक्वी यांचे कौतुक केले. देशाच्या विकासात नक्वी यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. नक्वी यांचा उद्या राज्यसभा खासदार म्हणून शेवटचा दिवस आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नक्वी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा  यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली असणारचं. मात्र याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. दुसरीकडे मात्र, नक्वी यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीत भाजपने नक्वी यांना उमेदवारी दिली नव्हती. तेव्हापासून पक्षाकडून त्यांना नवीन भूमिका दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. वास्तविक, मुख्तार अब्बास नक्वी आणि रामचंद्र प्रसाद सिंह यांचा राज्यसभा खासदार म्हणून कार्यकाळ गुरुवारी संपत आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली दोन्ही केंद्रीय मंत्र्यांच्या कामांचे कौतुक करण्यात आले. ही त्यांची शेवटची मंत्रिमंडळ बैठक होती.

तसेच, हे दोन्ही मंत्री बुधवारी आपले राजीनामे पंतप्रधानांकडे सोपवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नक्वी यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची पक्षाच्या मुख्यालयात जाऊन भेट घेतली. भाजपचे ज्येष्ठ नेते नक्वी हे राज्यसभेचे उपनेतेही आहेत. तर, रामचंद्र प्रसाद सिंह हे JD(U) कोट्यातून मोदी मंत्रिमंडळात मंत्री आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.