Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू प्रकरण : चौकशीसाठी पोलीस उपमहानिरीक्षक यवतमाळमध्ये दाखल

पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू प्रकरण : चौकशीसाठी पोलीस उपमहानिरीक्षक यवतमाळमध्ये दाखल



राष्ट्रीय मानव हक्क आयोगाने या मृत्यू प्रकरणाची दखल घेतल्यानंतर खळबळ उडाली होती. सहा वर्षांपूर्वी यवतमाळमधील अवधुतवाडी पोलिसांच्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. राष्ट्रीय मानव हक्क आयोगाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणात ठपका ठेवण्यात आलेल्या तत्कालीन पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना आज (मंगळवार) यवतमाळ येथे दाखल झाले आहेत.

२०१५ मध्ये चोरीच्या गुन्ह्यात अवधूतवाडी पोलिसांनी विजय घुटके याला अटक केली होती. कारागृहातून बाहेर आल्यावर काही दिवसांतच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत विजयचा मृत्यू झाला, असा आरोप करीत नातेवाईकांनी राष्ट्रीय मानव हक्क आयोगाकडे तक्रार केली. याच तक्रारीवरून आयोगाने चौकशी समिती गठीत केली. तेव्हापासून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.