Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत बांधकाम कामगारांच्या मुला मुलींचे संगणक प्रशिक्षण शिबिर संपन्न

 सांगलीत बांधकाम कामगारांच्या मुला मुलींचे संगणक प्रशिक्षण शिबिर संपन्न


शनिवार दिनांक 2 जुलै रोजी ठीक सकाळी 11 वाजता नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुला मुलींचे प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ झाला. सुरुवातीस  बांधकाम कामगारांच्या मुला मुलींच्या साठी  देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती व इतर सुविधा बाबतची माहिती ज्येष्ठ कामगार नेते कॉ शंकर पुजारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या जनरल सेक्रेटरी प्रा. शरयू बडवे  यांनी शिबिरामध्ये घेण्यात येणाऱ्या विषयासंबंधी माहिती दिली. यामध्ये कमवा व शिका योजनेनुसार संगणकांमधील अनेक कोर्सेस करता येतात. त्यापैकी एक बीबीए आणि बीएससी कोर्स तसेच एम एस सी आय टी बाबत विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे कोर्स पूर्ण करावेत  व स्वतःचे भवितव्य घडवीण्यासाठी या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात येईल असे सांगितले.

यानंतर सांगली एमकेसील संस्थेचे प्रतिनिधी श्री अभिजीत पाटील यांनी सविस्तरपणे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण विविध संगणकीय कोर्सेस बाबतची माहिती दिली. यामध्ये विविध  संगणकीय कोर्सेस पूर्ण करीत असताना काही नामवंत कंपन्यांच्या मार्फत त्यांना काम देऊन विद्यार्थ्यांना स्टायपेंड सुद्धा मिळेल  व त्यांना  विद्यापीठाच्या डिग्रीसह प्रशिक्षण पूर्ण करता येईल. यामधून त्यांना सर्विस सेंटर मध्ये चांगल्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. शिबिरासाठी विद्यार्थ्यांच्या कडून चांगला प्रतिसाद मिळाला या कार्यशाळेचे संयोजन करण्यामध्ये कॉ विशाल बडवे व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.