माझी वसुंधरा अंतर्गत जुना कुपवाड रोडवर वृक्षारोपण
सांगली : माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सांगली जुना कुपवाड रोड कोरे असेट्स ते आप्पासाहेब काटकर चौक ऐंशी फुटी डी पी रस्त्याकडेस वृक्षारोपण करण्यात आले. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत हे वृक्षारोपण पार पडले.
यामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने ताम्हण, बकुळ, कांचन, बहावा, पळस, आपटा इत्यादी प्रकारच्या २८ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमात नगरसेवक संतोष पाटील, रोटरी क्लब ऑफ सांगलीचे सदस्य यांनी सहभाग घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.