Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

श्री. रावसाहेब पाटील यांची महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी फेरनिवड

 श्री. रावसाहेब पाटील यांची महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी फेरनिवड


सांगली : रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी नुकतीच फेरनिवड झाली. शिक्षण महामंडळाच्या संचालक मंडळ सभेत त्यांची एकमताने निवड करणेत झाली. गेली अनेक वर्षे ते या महामंडळावर कार्यरत असून या मंडळाच्या विकासाच्या अनेक संकल्पना

त्यांनी राबविल्या आहेत. मागील कालावधीत त्यांनी महामंडळावर काम करीत असताना या महामंडळास सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच शिक्षण संस्थाच्या अनेक मागण्या शासन दरबारी ठेवून त्या पुर्ण करुन घेण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. शिक्षण संस्थाच्या मागण्यासाठी त्यांनी ठाम भुमिका घेतल्याचे अनेक वेळा पाहिले आहे. या शिक्षण महामंडळाचे एक राज्यव्यापी महाअधिवेशन सांगली येथे घेवून मुख्यमंत्री यांचे सह अनेक दिग्गज नेत्याना त्यास आणण्याची संपुर्ण तयारी त्यांनी केली होती. पण कोरोनामुळे ऐनवेळी हे अधिवेशन रद्द करावे लागले होते. शिक्षण संस्था चालकांची एक वज्रमुठ त्यांनी बांधली आहे. श्री. रावसाहेब पाटील हे सामाजिक आर्थिक, धार्मीक शैक्षणिक, औद्योगिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. या पुर्वी ते

चेअरमन :- कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली

कोषाध्यक्ष :- महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणे

चेअरमन :- दक्षिणभारत जैन सभा

चेअरमन :- शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी

माजी सदस्य :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग

संचालक :- लट्टे एज्युकेशन सोसायटी संचालक :- स्वदेशी औषध उद्योग समुह माजी उपाध्यक्ष :- महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असो.

संस्थापक :- सांगली जिल्हा केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असो. अध्यक्ष :- स्वदेशी ट्रस्ट, सांगली अशा अनेक संस्थांवर त्यांनी काम केले आहे. तसेच अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. या निवडीबद्दल त्यांचा कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. व त्याच्या कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे संचालक डॉ. रमेश वसंतराव ढबू अँड. एस. पी. मगदूम श्री. वसंतराव धुळाप्पा नवले. श्री. लालासो भाऊसो थोटे कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट चे ट्रस्टी डॉ. अशोक आण्णा सकळे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदुम हे उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.