Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


सांगली, दि. 4,  : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सुचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 9 डिसेंबर 2020 अन्वये निश्चित केल्या आहेत. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या योजनेकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली, जुना बुधगाव रोड सांगली यांच्याकडे सर्व अटी व शर्तीची पुर्तता करून प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.