Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या सांगली महिला शहर अध्यक्षांची निवड

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या सांगली महिला शहर अध्यक्षांची निवड 


मा.ना.जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष मा. संजयजी बजाज साहेब, युवक शहरजिल्हा अध्यक्ष मा. राहुलदादा पवार, यांच्या नेतृत्वाखाली  व मिरज शहर महिला अध्यक्षा तसेच संजय गांधी निराधार योजना मिरज शहराध्यक्ष सौ. वंदनाताई चंदनशिवे यांच्या  मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या सांगली महिला शहर अध्यक्षांची निवड करण्यात आली  

 सांगली शहर महिला समाजिक न्याय विभागाच्या अध्यक्ष पदी सौ. सुरेखा संजय सातपुते  यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब व युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार व नगरसेवक हरिदास  पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले. यांच्या निवडी सौ संध्या आवळे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष यांनी केल्या. यावेळी नगरसेवक हरिदास पाटील, सांगली शहर महिला अध्यक्षा सौ. अनिता पांगम, सचिव डॉ शुभम जाधव , निलेश शहा व  संजय सातपुते आदी पदाधिकारी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.