Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तासगाव तालुक्यातील किंदरवाडी ग्रामपंचायतीचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

तासगाव तालुक्यातील किंदरवाडी ग्रामपंचायतीचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी



  सांगली, दि. 30,  : राज्य निवडणूक आयोगाने जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणक प्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील किंदरवाडी ग्रामपंचायतीचा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान दिनांक 4 ऑगस्ट 2022 तर मतमोजणी 5 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. ग्रामपंचायत निवडणूकीकरीता राज्य निवडणूक आयोगाकडील आदेशानुसार आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी व आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही असे नमूद केले आहे.

जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकप्रणालीवदारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे. तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक - दिनांक 5 जुलै 2022 (मंगळवार). नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अअ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) - दिनांक 12 जुलै 2022 (मंगळवार) ते दिनांक 19 जुलै 2022 (मंगळवार) वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 (दिनांक 16 जुलै 2022 चा शनिवार व दिनांक 17 जुलै 2022 चा रविवार वगळून). नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचर दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) - दिनांक 20 जुलै 2022 (बुधवार) वेळ सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) - दिनांक 22 जुलै 2022 (शुक्रवार) दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ - दिनांक 22 जुलै 2022 (शुक्रवार) दुपारी 3 वाजल्यानंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक - दिनांक 4 ऑगस्ट 2022 (गुरूवार) सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत. मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) - दिनांक 5 ऑगस्ट 2022 (शुक्रवार). जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक - दिनांक 11 ऑगस्ट 2022 (गुरूवार) पर्यंत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.