Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुपवाड शहरात तेरा वर्षाच्या मुलाने शाळेत घेटला दुसरा डोस अणि....

कुपवाड शहरात तेरा वर्षाच्या मुलाने शाळेत घेटला दुसरा डोस अणि....


कुपवाड शहरात एका विद्यार्थ्याला कोरोना लसीकरणाचा डोस दिल्याने डोळ्याला डबलदृष्टीची समस्या निर्माण झाल्याचे समोर आले आहे. लसीकरण दिल्यामुळेच मुलाला हा त्रास सुरू झाल्याचा आरोप संबधीत मुलाच्या  पालकांनी केले आहेत. मात्र मनपा प्रशासनाकडून सर्व ठीक असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनंतर मुलाला उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. इलियास युसुफ नदाफ (वय 13 वर्षे) असे पीडित मुलाचे नाव आहे. सध्या मुलाच्या मेंदूला सूज आली असुन डोळ्याला प्यारा लिसिस झाले असल्याचे वडील युसुप नदाफ यांना डॉक्टरनी सांगितले आहे. उपचारासाठी त्या विद्यार्थीला मिरज येथिल खाजगी रुग्णालय दार करण्यात आले.

अशी घडली घटना

कुपवाड शहरातील देशभक्त आर. पी. पाटील हायस्कूलमध्ये इ.9 वीत इलियास युसुफ नदाफ ( 13 वर्षे) हा विद्यार्थी शिक्षण घेत आहे. कोरोनाच्या लसीकरणासाठी तो पात्र असल्याने त त्याने पहिला डोस घेतला. त्यानंतर दुसरा डोसच्या 30 तारखेला आशा वर्करने लसीकरणाचा दुसरा डोस दिला. त्यानंतर प्रत्येक वस्तू चक्क दोनवेळा दिसत आहेत. त्यामुळे पालक खूप चिंतेत आहेत. सध्या मुलाच्या मेंदूला सूज आली असुन डोळ्याला प्यारीलेस झाले असल्याचे वडील युसुप नदाफ यांना डॉक्टरनी सांगितले आहे. उपचारासाठी त्या विद्यार्थीला मिरज येथिल खाजगी रुग्णालय दाखल करण्यात आले. परंतु त्यांचे वडील रस्त्यावर बाजारात कपडे विकत असल्यामुळे घरची परिस्थिती बेत्ताची आहे. त्याला पुन्हा सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानतंर महापालिकेचे डॉ. पल्लवी पाटील व डॉ. वैभव पाटील यांच्या टिमने सिव्हिल मध्ये येऊन त्या विद्यार्थ्यांची चौकशी करून पहाणी केली. यावेळी डॉ. पाटील म्हणाले डॉ. ससे व सिव्हिलचे व महापालिकेचे डॉक्टर या विद्यार्थ्यांवर उपचार करात येऊन त्या विद्यार्थ्यांची चौकशी करून पहाणी केली. यावेळी डॉ. पाटील म्हणाले डॉ. ससे व सिव्हिलचे डॉक्टर व महापालिकेचे डॉक्टर या विद्यार्थ्यांवर उपचार करीत आहेत.त्यांची प्रकृती चांगली होईल काहीही काळजी करु नका असे पालकांना त्यांनी सांगितले आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांनी केला हा आरोप..

यावेळी सामाजिक कार्यकर्ते वसीम गायकवडी म्हणाले. शाळेत लसचा दुसरा डोस दिल्याने हा प्रकार घडला यांची मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी संबंधित पालकांना कोणतीही कल्पना दिली नाही. लस ही आशा वर्करने दिली आहे. यावेळी महानगरपालिकेचे डॉक्टर कोणीच उपस्थित नव्हते. त्या मुलाला अगोदर चक्कर आली होती. असे शाळेकडून पालकांना सांगन्यात आले होते.मात्र त्या मुलाला उपचारासाठी दाखल केल्या नंतर डाँक्टरांनी त्याचा मेंदूला सूज आली असून डाव्या डोळ्याला पॅरलेस झाल्याचे धक्कादायक माहिती सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.