महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना पेट्या मिळणार!
सांगली जिल्ह्यात मिरज येथील भीमपलास घरकुल योजनेमध्ये 90 बांधकाम कामगारांना प्रत्येकी दोन लाख रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव मंजूर करून सांगलीचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री अनिल गुरव यांनी मंजुरीचा प्रस्ताव नुकतेच बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे सुपूर्द केलेला आहे.
याशिवाय सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये घरकुलासाठी प्रत्येकी दोन लाख रुपये अनुदान मिळण्यासाठीच्या १८०अर्जांची सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यामार्फत योजनेप्रमाणे तपासणी सुरू आहे. परंतू बांधकाम कामगारांच्या घरांची योजनाच मंजूर होत नाही. म्हणून कामगारांना फोन करून दमदाटी करणाऱ्या आणि बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या तसेच बांधकाम कामगारांची लूट करणाऱ्या भामट्यापासून कामगारांनी सावध राहावे म्हणूनच महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांनी प्रत्येक सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन घर मागणीचे अर्ज सादर करावेत. याबाबतच्या शासकीय निर्णयाची जीआर प्रति आवश्यक असल्यास आयटक संघटनेबरोबर संपर्क करावा.
संपर्क क्रमांक 9960499366 /7767877006/9146046088/8087122839.
कॉ शंकर पुजारी सरचिटणीस
महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना फेडरेशन Aituc
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.