'सरल वास्तु' फेम चंद्रशेखर गुरुजी यांची चाकूने भोसकून हत्या, घटना कॅमेरात कैद
बागलकोट (कर्नाटक) : वास्तूशास्त्रातील तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करण्यात आली आहे. चंद्रशेखर गुरुजी कामानिमित्त हॉटेलमध्ये गेले असता त्यांची हत्त्या केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
'सरल वास्तू' फेम चंद्रशेखर गुरुजी यांची कर्नाकमधील हॉटेलमध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हुबळी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्हीत हॉटेलच्या रिसेप्शनमध्येच चंद्रशेखर गुरुजी यांना हल्लेखोरांनी चाकूने भोसकल्याचं दिसत आहे. यानंतर तिथे उपस्थित लोक घाबरुन पळत असल्याचंही दिसत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. चंद्रशेखर गुरुजी यांच्यावर अनेकांनी हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत दिसत असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच हुबळीच्या पोलीस आयुक्तांनीही घटनास्थळी धाव घेतली. "मोबाइल टॉवरच्या आधारे आम्हाला काही माहिती मिळाली आहे. तपासानंतरच हत्येमागचं कारण समजू शकेल. आम्ही सध्या कुटुंबीयांचेही जबाब नोंदवत आहोत".तीन दिवसांपूर्वी त्यांच्या कटुंबातील एका मुलाचा मृत्यू झाला होता. यासाठीच ते हुबळी येथे आले होते अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली.
कोण होते चंद्रशेखर गुरुजी?
चंद्रशेखर गुरुजी हे मूळचे कर्नाटकच्या बागलकोट येथील होते. तिथेच त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी कंत्राटदार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांना मुंबईत नोकरी मिळाली आणि ते इथेच स्थायिक झाले. दोन वर्ष त्यांनी रिअल इस्टेट कंपनीत काम केलं. यानंतर त्यांनी नोकरी सोडून आपली कंपनी सुरु केली. पण एका व्यक्तीने त्यांची १५ लाखांना फसवणूक केली. त्यानंतर त्यांनी अनेक गावं, शहरांचे दौरे केले.
नंतर त्यांनी वास्तू विषयावर अभ्यास सुरु केला. 'सरल वास्तू' या कार्यक्रमातून त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि ते घराघरात पोहोचले. वास्तू विषयावर त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केलं होतं. चंद्रशेखर गुरुजी मूळचे कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील आहेत. त्यांना सैन्यात भरती व्हायचे होते परंतु आवश्यक निकष पूर्ण न केल्यामुळे त्याची निवड होऊ शकली नाही. चंद्रशेखर यांनी सर्वोत्तम शिक्षणाचे ध्येय ठेवले आणि बागलकोटमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर मुंबईत कंत्राटदार म्हणून कारकीर्द सुरू केली.
काही वर्षे बांधकाम कंपनीत काम केल्यानंतर चंद्रशेखर यांनी स्वत:ची कंपनी सुरू केली. सुरुवातीला चांगली प्रगती झाली पण नंतर त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. याच दरम्यान त्याचे वास्तूबद्दलचे प्रेम वाढत गेले. बांधकाम सुरू असतानाच त्यांनी लोकांची घरे चुकीच्या पद्धतीने बांधल्याचे पाहिले. त्यानंतर ते वास्तूचा अभ्यास करण्यासाठी सिंगापूरला गेले.
परत आल्यानंतर त्यांनी वास्तूशी संबंधित काम पाहण्यास सुरुवात केली. त्यांनी प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्रावर आधारित एक साधी वास्तुरचना केली. सल्लागार म्हणून त्यांची ओळख होती. लोकांच्या समस्यांवर ते सोपे उपाय सुचवायचे. हळुहळू मागणी वाढत गेल्याने त्यांनी बंगळुरू, हुबळी आणि कर्नाटकातील इतर शहरांमध्ये कार्यालये उघडली. मुंबईत एक कॉल सेंटर आहे जिथे शेकडो कर्मचारी लोकांना वास्तूबद्दल सल्ला देतात.
यश पाहून डॉ.चंद्रशेखर गुरुजींनी ‘सरल वास्तू’ नावाची वाहिनी सुरू केली. चंद्रशेखर यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर वास्तूमध्ये बदल करून अनेक लोक समृद्ध झाले. चंद्रशेखर गुरुजी अनेक खाजगी वाहिन्यांवरही सल्ला देत असत. काही काळापूर्वी चंद्रशेखर यांच्यावर सरल वास्तूच्या नावाने वास्तुशास्त्रातील वास्तवाचे अवमूल्यन केल्याचा आरोप करण्यात आला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.