Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बांधकाम कामगारांचे राज्यातील सर्व लाखों प्रलंबित अर्ज मंजूर करून बांधकाम कामगारांना लाभ द्या.

बांधकाम कामगारांचे राज्यातील सर्व लाखों  प्रलंबित अर्ज मंजूर करून बांधकाम कामगारांना लाभ द्या. 



बांधकाम कामगारांचे राज्यातील सर्व लाखों  प्रलंबित अर्ज मंजूर करून बांधकाम कामगारांना लाभ द्या. तसेच देशातील शेतमजुरांच्या मागण्यासाठी एक ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा.

महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने 18 जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त श्री सुरेश जाधव यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये अशा मागण्या करण्यात आलेले आहेत की,(१) बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अवजारे देणे बंद न करता मंडळाकडून जून 2022 नंतरही अर्ज केलेल्या सर्वांना सुरक्षा संच पेट्या द्या.(२)  महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतल्यानुसार  बांधकाम कामगारांच्या एका मुलीच्या विवाहासाठी 51 हजार रुपये देण्याबरोबरच दुसऱ्या मुलीच्या विवाहसाठी सुध्दा 51 हजार रुपये मिळावेत.(३) सन 2019 पासून ज्या नोंदणी बांधकाम कामगारांची घरे महापुरामध्ये पडली असतील अथवा बाधित झालेले असतील त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये निर्णय घेतल्यानुसार त्वरीत द्या. (४) 1 वर्षापूर्वी महाराष्ट्र बांधकाम कल्याणकारी मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार नोंदीत बांधकाम कामगार कोणत्याही वयाचा असो त्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय अमलात आणावा.(५) सध्या ऑनलाईन पद्धतीने जे प्रत्येक जिल्ह्यातून अर्ज मंजूर होऊन मुंबई बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे रक्कम मिळण्यासाठी जातात असे लाखो मंजूर प्रलंबित अर्ज आहेत  त्या सर्वांना त्वरित शिष्यवृत्ती व इतर लाभ मिळावेत.(६) मागील एक वर्षापासून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची मुदत संपल्यामुळे सर्व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे काम ठप्प आहे. म्हणून तातडीने कामगार प्रतिनिधी व मालक प्रतिनिधी यांची नेमणूक करून कल्याणकारी मंडळाच्या कार्यास सुरुवात करावी.(७) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे ऑनलाईन काम करण्यासाठी 450 कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना किमान दरमहा 22 हजार रुपये वेतन देण्यात यावे.


 याबाबत बोलताना महाराष्ट्राचे कामगार आयुक्त श्री सुरेश जाधव यांनी सांगितले की. ऑनलाइन चे काम करणाऱ्या 450 कंत्राटी कामगारांना कोणते व किती किमान वेतन देणे या कंत्राटी कामगारांना कायद्यानुसार शक्य आहे त्याबाबत लेखी संघटनेस कळविण्यात येईल. 

इतर मागण्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ  सचिवांच्या बरोबर चर्चा करावी असेही त्यांनी सूचित केले. राज्य कामगार आयुक्त यांना निवेदन देताना कॉ शंकर पुजारी, कॉ सुनील पाटील पालघर, कॉ रमेश जाधव ठाणे, उस्मान शेख परभणी, इस्माईल शेख, सुहास साका कोल्हापूर व सुभाष चौगुले कोल्हापूर इत्यादी उपस्थित होते. त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने मुंबईतच बैठक होऊन असा निर्णय घेण्यात आला की तातडीने शक्य असेल त्या जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांचे मंजूर अर्जाची रक्कम मिळण्यासाठी व इतर मागण्यांसाठी आंदोलन करावे असा निर्णय झाला. यानुसार एक ऑगस्ट 2022 रोजी ठीक सकाळी 11 वाजता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यातील शेतमजुरांना ज्याला घर नसेल त्याला घर मिळाले पाहिजे, रोजगार हमी योजनेवरील कामगारांना दररोज किमान सहाशे रुपये मोबदला मिळाला पाहिजे. रोजगार हमी योजनेवर वर्षातून किमान 200 दिवस काम मिळाले पाहिजे. रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या सर्वांना बांधकाम कामगारांचे ओळखपत्र मिळाले पाहिजे इत्यादी महत्त्वाच्या मागण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे.  यानुसार वरील प्रमाणे पत्रक महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक कॉ शंकर पुजारी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.