Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीतील तिघे ओमानच्या समुद्रात बुडाले

 सांगलीतील तिघे ओमानच्या समुद्रात बुडाले


सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील तिघेजण ओमानमधील समुद्र किनाऱ्यावर बुडाले. रविवारी दुपारी ही घटना घडली असून, या घटनेत जत येथील शशिकांत म्हमाणे, त्यांची नऊ वर्षाची मुलगी श्रुती आणि सहा वर्षाचा मुलगा श्रेयस हे समुद्राच्या लाटेत वाहून गेले आहेत. त्यांचा शोध घेतला जात असून, अद्याप शोध लागलेला नाही. मूळचे जत येथील शशिकांत म्हमाणे हे मागील अनेक वर्षांपासून दुबई येथील एका कंपनीत मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती आणि अन्य एक मुलगी यांच्यासह दुबई येथे राहण्यास होते.

बकरी ईदमुळे सुट्टी असल्याने मयत शशिकांत, पत्नी, मुले आणि मित्रांसह दुबई जवळ असलेल्या ओमान या देशात फिरायला गेले होते. त्यावेळी ही घटना घडली. ते सांगली जिल्ह्यातील जत तेथील वकील वकील राजकुमार म्हमाणे यांचे बंधू होते.


शशिकांत हे दुबई येथील एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर होते. रविवारी ईदच्या सुट्टीनिमित्त ते कुटुंबीय व अन्य मित्रांच्या सोबत सहलीसाठी बाहेर गेले होते. पत्नी सारिका, मुलगा श्रेयस व मुलगी श्रुती, तसेच त्यांचे काही मित्रांचे कुटुंबीय सुट्टीसाठी समुद्र किनाऱ्यावर पोहोचले होते. समुद्र किनाऱ्यावर जाण्यापूर्वीचे त्यांचे आनंदी व उत्साहातील व्हिडिओ त्यांनी शेअर केले आहे. सहलीसाठी गेलेले हे सर्व टीम सोबत दिसत आहेत. ओमान येथील सलालाहा या समुद्रकिनारी प्रचंड लाटा उठत असताना त्या ठिकाणी ते गेले.

यावेळी झालेल्या दुर्घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला असून, व्हिडिओमध्ये प्रचंड मोठ्या लाटा किनाऱ्यावर येऊन आदळताना दिसत आहे. यातच एक मोठी लाट उसळल्यानंतर काहीजण समुद्रामध्ये ओढले गेल्याचं ते दिसत आहे. त्यामध्ये लहान दोन बालके पाण्यामध्ये वाहून गेलेली दिसत आहेत.

शशिकांत म्हमाणे यांचं कुटुंब

ही दोन्ही मुलं शशिकांत यांची मुले आहेत. मुलांना वाचवण्यासाठी शशिकांत म्हमाणे यांनी समुद्रामध्ये उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. समुद्राच्या लाटा प्रचंड असल्यामुळे हे सर्वजण खोल समुद्रामध्ये ओढले गेले.

रविवारी सदरची दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर त्यांचे बंधू राजकुमार महमानी हे तातडीने दुबईला गेले आहेत. त्यांच्याशी यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.