Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

".तर सरकार बरखास्त होऊ शकतं" ; कायदेतज्ञ उल्हास बापट यांची महत्वाची माहिती

 ".तर सरकार बरखास्त होऊ शकतं" ; कायदेतज्ञ उल्हास बापट यांची महत्वाची माहिती


पुणे : महाराष्ट्रातील राजकीय संकट अद्याप संपलेले नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होती. त्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सरकार स्थापन केले आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या काही याचिकांवर आज सुनावणी पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वकील कपिल सिब्बल तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीने वकील हरीश साळवे यांनी जोरदार युक्तिवाद केला. या प्रकरणी पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे. तसेच हे प्रकरण मोठ्या खंडपीठात जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

यावर कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी महत्वाची माहिती दिली आहे. न्यायालयाच्या निकालाच १६ आमदार जर अपात्र झाले तर राज्यातील सरकार बरखास्त होऊ शकत, असं मत घटनातज्ञ उलास बापट यांनी व्यक्त केलं. आपत्रतेची कारवाई करण्यात आलेले 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पण नाव आहे. जर एखाद्या मंत्र्याला सभासद नसताना देखील मंत्री राहता येत पण पक्षांतर बंदी कायद्याखाली जर कारवाही झाली तर त्या आमदाराला मंत्री राहत येत नाही.

म्हणून जर १६ आमदार आपत्र झाले तर सरकार बरखास्त होऊ शकतं, असं मत निरीक्षण उल्हास बापट यांनी नोंदविले आहे. भारत हा संघ राज्य आहे त्यामुळे इतर राज्यांमध्ये देखील अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत.यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वकील कपिल सिब्बल आणि शिंदे गटाच्या वतीने वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंडपीठामार्फत केली जाऊ शकते, असे संकेत दिले आहेत. सीजेआय म्हणाले की आम्ही हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याचे आदेश देत नाहीत. फक्त आमचा विचार आहे.

आता या प्रकरणाची सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे. यासोबतच सर्व पक्षांकडून प्रतिज्ञापत्रेही मागविण्यात आली आहेत. कोणते मुद्दे ऐकून घ्यायचे आहेत, हे दोन्ही पक्षांना लिखित स्वरूपात द्यावे लागेल. कोर्टाने विधानसभेचे रेकॉर्ड जपण्यास सांगितले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.