Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत आंदोलनात शिवराळ भाषा वापरल्याबद्दल गुन्हे दाखल करावेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत आंदोलनात शिवराळ भाषा वापरल्याबद्दल  गुन्हे दाखल करावेत


काॅग्रेस जिल्हाअध्यक्ष पुथ्वीराज पाटील व इतर प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांचेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत आंदोलनात शिवराळ भाषा वापरल्याबद्दल  गुन्हे दाखल करावेत- संघटन सरचिटणीस दीपक माने. सांगलीमध्ये काल काँग्रेस पक्षाच्यावतीने खाद्यपदार्थांच्या वर जीएसटी टॅक्स लागू केला आहे  म्हणून काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील व इतर प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोदी सरकारच्या निषेधार्थ झांसी चौक सांगली येथे आंदोलन केले .

त्या आंदोलनामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या बाबतीत अत्यंत खालच्या दर्जाची व शिवराळ भाषा वापरली या विरोधात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संघटक सरचिटणीस दीपक माने यांनी सांगली शहर पोलीस ठाणे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवराळ भाषा वापरली व यामुळे भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व भारतातील नागरिकांच्या भावना दुखावल्याबद्दल काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील व इतर नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वर गुन्हे दाखल करण्यासाठी फिर्याद दिली. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.