Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सर्वसामान्यांना मोठा धक्का,'या' जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढणार !

 सर्वसामान्यांना मोठा धक्का,'या' जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढणार !


नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्य जनतेच्या चिंतेत भर घालणारी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 47 व्या GST बैठकीत अनेक निर्णय घेतले आहेत.त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर 18 जुलै 2022 पासून दिसणार आहेत.

18 जुलैपासून अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत.आतापासून तुम्हाला दैनंदिन खाद्यपदार्थांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.तर या खाद्यपदार्थांमध्ये दुधाचाही समावेश असून त्याच्या दरातही पुढील आठवड्यापासून वाढ होणार आहे.

खालील वस्तूंच्या किंमती वाढणार

काही वस्तू आणि सेवांवर जीएसटी दर वाढतील, त्यानंतर पनीर, लस्सी, बटर मिल्क, पॅकेज केलेले दही, गव्हाचे पीठ, कडधान्ये, मध, पापड, तृणधान्ये, मांस आणि मासे यांच्या किंमती वाढतील. प्री-पॅकेज केलेल्या लेबलांसह कृषी मालाच्या किंमतीही 18 जुलैपासून वाढणार आहेत.या उत्पादनांवरील करात वाढ केली आहे. सध्या ब्रँडेड आणि पॅकेज्ड खाद्यपदार्थांवर 5 टक्के जीएसटी आकारला जातो.अनपॅक केलेली आणि लेबल नसलेली उत्पादनं करमुक्त आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.