केतकी चितळेनं पुन्हा डिवचलं...
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर मराठी अभिनेत्री केतकी चितळे चांगलीच चर्चेत आली होती. मे महिन्यात अटक झाल्यानंतर २४ जून रोजी केतकीला जामीन मंजूर झाला. मात्र हा जामीन केवळ ठाणे येथील तक्रारीबाबत होता,केतकीवर अजूनही २२ वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी आहेत.
आता पुन्हा एकदा केतकी चितळे तिच्या नव्या विधानांमुळे चर्चेत आली आहे. केतकीने तिच्या सोबत घडलेल्या घटनेचा अनुभव एका वृत्त वाहिनीला सांगत धक्कादायक खुलासे केले होते. 'एखादी पोस्ट कॉपी पेस्ट करून फेसबुकवर शेअर केल्यानंतर तो एवढा मोठा गुन्हा होतो का की तुम्ही एकाला तुरुंगात टाकता, ४१ दिवस तुम्ही त्या व्यक्तीपासून काढून घेता?' असा थेट सवाल केतकीने यावेळी विचारला होता.
केतकीने पुन्हा एकदा नवीन विधान करत नवा वाद सुरु केलाय. मी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत पोस्ट केली होती. ते लोकांनी एखाद्या वेगळ्या अर्थाने घेतलं तर मी त्यात काहीही करु शकत नाही. मी केवळ काही यमक जुळवून केलेल्या पोस्टसाठी तुरुंगात होते. पवार म्हणजे धर्म नाहीत, असं केतकीने म्हटलं आहे. केतकीच्या या वादग्रस्त विधानानंतर ती पुन्हा चर्चेत आली आहे.
पोलिसांवरही केले होते आरोप
केतकीला जामीन मंजूर झाल्यानंतर तिने आपल्या अटकेची कहाणी सांगत अनेक नवं नवीन खुलासे केले होते. त्यात ती म्हणते सुरुवातीला मला बेकायदेशीररित्या घरातून नेण्यात आले. त्यानंतर बेकायदेशिररित्या अरेस्ट वॉरंट अन् नोटिसशिवाय जेलमध्ये टाकण्यात आले. मला अर्ध्या तासाचीही नोटीस दिली गेली नाही, थेट पोलीस घरी आले आणि मला उचलून घेऊन गेले. हा देखील गुन्हाच आहे.' ती पुढे म्हणते, 'माझ्या कानाखाली मारण्यात आलं, डोक्यात कुणीतरी जोरात टपली मारली आणि राइट ब्रेस्टवर पंच मारला.' असं म्हणत तिने पोलिसांवर आरोप केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.