Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'ब्रँड सांगली'ने जागवल्या सांगली जेलफोडीच्या स्मृती जेलसमोर स्मृति फलकाचे अनावरण

'ब्रँड सांगली'ने जागवल्या सांगली जेलफोडीच्या स्मृती जेलसमोर स्मृति फलकाचे अनावरण


सांगली, दि.२४ :  सांगलीचा जेल फोडणार्‍या क्रांतिकारकांच्या नावाचा आणि त्या ऐतिहासिक प्रसंगाचा फलक सांगली जेलसमोर उभा करून आज सांगली ब्रँडच्यावतीने या घटनेच्या आठवणी जागवल्या. यावेळी ब्रँड सांगलीचे निमंत्रक सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माधवराव माने, संजय बालगुडे, आर्किटेक्ट प्रमोद चौगुले हे प्रामुख्याने उपस्थित होते.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात  इंग्रजांच्या छाताडावर लाथ मारून सांगली जिल्ह्यातील थोर क्रांतिकारकांनी २४ जुलै, १९४३ रोजी सांगलीचा जेल फोडून जी ऐतिहासिक उडी घेतली होती, ती अभूतपूर्वच होती. आज त्या घटनेला ७९ वर्षे पूर्ण झाली.  या लढ्यात क्रांतिकारकांच्या शौर्याला स्मरून सांगली कारागृहासमोर ब्रँड सांगलीच्यावतीने स्मृतीफलक उभारण्यात आला.  यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी व मान्यवर उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.