Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काजोल सरगर ही वेटलिफ्टिंगच्या खेळामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करेल

काजोल सरगर ही वेटलिफ्टिंगच्या खेळामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करेल. 




तिच्या पाठीमागे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे पाठबळ उभे राहील आमदार गोपीचंद पडळकर                 


सांगली:  काजोल सरगर ही वेटलिफ्टिंगच्या खेळामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करेल. तिच्या पाठीमागे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे पाठबळ उभे राहील असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोलताना व्यक्त केले.          हरियाणा येथे खेलो युथ इंडिया स्पर्धेमध्ये  वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल सांगलीतील  अहिल्यादेवी होळकर चौक या ठिकाणी काजोल महादेव सरगर हिचा सत्कार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते .   

यावेळी पुढे बोलताना आ. पडळकर म्हणाले सर्वांना अभिमान वाटावे असे काजोलने काम केले आहे. तिच्या आई-वडिलांचे कष्टांचे चीज तीने  केले आहे .भविष्यात ती आपल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व करेल अगोदर खेळामध्ये देशाला पदके अतिकमी मिळत होती .गेल्या आठ वर्षापासून देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  खेळाकडे आधिक लक्ष दिल्याने व देशी खेळाचा समाविष्ट खेळामध्ये केल्याने देशाला अधिक पदे मिळतआहेत. काजोलला  केंद्र सरकार आणि राज्य सरकार तिच्या पाठीमागे उभे राहील. 

तिचे स्वप्नासाठी  व ध्येयासाठीआम्ही सर्वजण तिला ताकद देऊ असे आश्वासन पडळकर यांनी दिले. यावेळी नगरसेवक विनायक सिंहासणे, धीरज सूर्यवंशी, पांडुरंग कोरे ,महादेव सरगर, राजश्री सरगर ,दत्ता ठोंबरे, बाळासाहेब फोंडे .दरीबा बंडगर, आनंद म्हारगुडे,अभय म्हारगुडे भाजपचे युवानेता बंडू सरगर, रमेश खामकर ,जीवन सरगर, घोरपडीचे उपसरपंच तुकाराम टेंगले आदी उपस्थित होते. फोटो ओळ काजोल सरगर हिचा सत्कार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी धीरज सूर्यवंशी,दरिबा बडगर,महादेव सरगर, राजश्री सरगर,पांडूरंग कोरे ,रमेश खामकर आदी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.