Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बहुमत चाचणीत महाविकास आघाडीचा उडाला धुव्वा, 99 मतांवर 'आऊट'

 बहुमत चाचणीत महाविकास आघाडीचा उडाला धुव्वा, 99 मतांवर 'आऊट'


मुंबई 04 जुलै : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडखोरी करून मुख्यमंत्रिपद पटकावले. आता विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केले आहे. शिंदे सरकारने बहुमताचा 144 चा आकडा पूर्ण केला आहे.

त्यामुळे आता शिंदे आणि फडणवीस सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात 10 दिवसांच्या बंडखोरीनंतर मोठा बदल घडवणारे शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या नव्या सरकारने अखेरीस बहुमताची चाचणी पास केली आहे. शिंदे सरकारच्या बाजूने शिवसेना बंडखोर आणि भाजपच्या आमदारांनी मतदान केलं. सरकारने 144 बहुमताचा आकडा पार केला आहे.

शिंदे सरकारला एकूण 164 मतं मिळाली आहे. तर महाविकास आघाडीला फक्त 99 मतं मिळाली. तर 3 आमदार हे तटस्थ राहिले होते. यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पाच मोठे नेते बहुमत चाचणीला गैरहजर असल्याचे समोर आले. विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, संग्राम जगताप यांना सभागृहामध्ये येता आले आहे. सभागृहाची दार बंद झाल्यामुळे पाच नेत्यांना येता आले नाही. त्यामुळे हे पाचही नेते मतदानाला मुकले. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बहुमताची आकडेवारी मोजून दाखवली आणि सर्वात जास्त मतदान हे शिंदे सरकारच्या बाजूने असल्याचे जाहीर केले.

त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी एकच घोषणाबाजी केली. अखेरच्या क्षणी शिवसेना आमदार शिंदे गटात दरम्यान, बहुमत चाचणीच्या आधीच शिवसेनेला धक्का बसला. संतोष बांगर हे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबत होते. शिवसेनेच्या सुनील प्रभू यांचा व्हीप मानत संतोष बांगर यांनी काल शिवसेनेच्या बाजून मतदान सुद्धा केलं होतं.

मात्र आज ते शिंदे गटात सामील झाले. संतोष बांगर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पाहून अनेकांच्या भुवया उंचवल्या. त्यानंतर संतोष बांगर हे शिंदे गटातील आमदारांसोबत बस मधून विधानभवनात रवाना झाले होते. संतोष बांगर यांच्या बंडखोरीमुळे आता शिंदे गटातील शिवसेनेच्या आमदारांची संख्या आता 40 वर पोहोचली आहे. तर शिवसेने सोबतच्या आमदारांची संख्या आता 15 वर आली आहे. संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे गटाला मतदान केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.