Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विशेष शिबिरात 84 फाईल्सचा निपटारा : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार विशेष शिबीर संपन्न

विशेष शिबिरात 84 फाईल्सचा निपटारा : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार विशेष शिबीर संपन्न 


सांगली: महापालिकेत आयोजित विशेष शिबिरात प्रलंबित 84 फाईल्सचा निपटारा करण्यात आला आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार हे विशेष शिबीर संपन्न झाले.  विविध विभागात नगरसेवकांच्या कामाच्या फाईली हा प्रलंबित असल्याबाबत सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी आयुक्त कापडणीस यांची भेट घेऊन या फायलीचा निपटारा करण्याची विनंती केली होती. 

यानुसार आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार सोमवारी महापालिका मुख्यालय सभागृहात प्रलंबित फाईलचा निपटारा करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 150 प्रलंबित फाईल दाखल होत्या. यापैकी 84 फाईल्सचा निपटारा करण्यात आला आहे. यासाठी उपायुक्त चंद्रकांत आडके, अभियंता परमेश्वर अलकुडे, अंतर्गत लेखपरिक्षक डवरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.