महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मध्ये खेळणी वाटप
महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मध्ये खेळणी वाटप : महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणी वाटप
सांगली: महापालिकेच्या धामणी रोड येथील शाळा क्रमांक 7 मधील मुलांसाठी घेण्यात आलेल्या खेळण्यांचे वाटप महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मनपाचे गटनेते विनायक सिंहासने आणि विरोधीपक्ष नेते संजय मेंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण मंडळाकडून हा कार्यक्रम करण्यात आला.
महापालिकेकडून शाळा क्रमांक 7 च्या विद्यार्थ्यांसाठी खेळणी देण्यात आली आहेत. या शाळेच्या विकासासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी विशेष प्रयत्न करीत मनपा क्षेत्रातील सर्वच शाळा सुधारनेवर अधिक लक्ष दिले आहे. याचाच एक भाग म्हणून शाळा क्रमांक 7 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना खेळणी देण्यात आली आहेत. या खेळण्यांचे वाटप महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी मनपाचे गटनेते विनायक सिंहासने आणि विरोधीपक्ष नेते संजय मेंढे आणि नगरसेविका सविता मदने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास उपायुक्त चंद्रकांत आडके, मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी गीता शेंडगे , लेखापाल गजानन बुचडे, कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे, तात्यासाहेब सौन्दते, मुख्याध्यापिका स्मिता सौन्दते यांच्यासह शाळेच्या शिक्षिका पालक उपस्थित होते. यावेळी महापालिकेचे ब्रँड अंबेसिडर दीपक चव्हाण यांच्याकडून आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.