Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेच्या मनपा शाळा नंबर 7 आणि 19 साठी मनपाकडून स्कुल बस प्रदान

मिरजेच्या मनपा शाळा नंबर 7 आणि 19 साठी मनपाकडून स्कुल बस प्रदान 


मिरजेच्या मनपा शाळा नंबर 7 आणि 19 साठी मनपाकडून स्कुल बस प्रदान : महापौर आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत स्कुल बसचे लोकपर्ण: मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाची दमदार कामगिरी

सांगली: मिरजेच्या मनपा शाळा नंबर 7 आणि 19 साठी मनपाकडून स्कुल बस प्रदान करण्यात आली. यावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि गटनेते विनायक सिंहासने यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्या स्कुल बस या शाळा क्रमांक 7 आणि 19 मिरजच्या मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना प्रदान करण्यात आल्या. उत्कृष्ठ पटसंख्या असणाऱ्या शाळांना स्कुलबस देण्याचा उपक्रम मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी जाहीर केला होता त्यानुसार आयुक्त कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाची दमदार कामगिरी सुरू आहे.

   या दोन स्कुल बसच्या माध्यमातून मिरज शाळा क्रमांक 19 आणि 7 मधील विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या दोन्ही शाळात दोन दोन किलोमीटर अंतरावरून विद्यार्थी येतात त्यामुळं आता आशा विदयार्थ्यांना स्कुल बस आल्याने त्यांची सोय होणार आहे आणि विद्यार्थी संख्या वाढीसाठी सुद्धा मदत होणार आहे. आज्या स्कुल बसचा प्रदान सोहळा महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि गटनेते विनायक सिंहासने यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नगरसेवक योगेंद्र थोरात, नगरसेविका अनिता व्हनखंडे , उपायुक्त चंद्रकांत आडके, कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव, मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी गीता शेंडगे, लेखापाल गजानन बुचडे, कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे, तात्यासाहेब सौन्दते यांच्यासह शाळां क्रमांक 19 चे मुख्याध्यापक अरुण कदम, शाळा क्रमांक 7 च्या मुख्याध्यापक रेश्मा मोरे, शिक्षक उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.