माझी वसुंधराच्या समन्वयकाना माझी वसुंधरा 3.0 चे प्रशिक्षण : शासनाच्या प्रतिनिधींकडून प्रशिक्षण
सांगली : सांगली जिल्ह्यात विविध नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये काम करीत असणाऱ्या माझी वसुंधराच्या समन्वयकाना माझी वसुंधरा अभियान 3.0 चे प्रशिक्षण शासनाच्या प्रतिनिधींकडून प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखालील माझी वसुंधरामधील सांगली महापालिका कामकाजाचे शासनाच्या प्रतिनिधींकडून कौतुक करण्यात आले.
महापालिकेच्या मंगलधाम सिटी कमांड सेंटरमध्ये हे प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणास शासनाचे प्रतिनिधी माझी वसुंधरा समवयस्क रंजन पांढरे आणि प्रियांका नवगीरे यांनी सर्वाना माझी वसुंधरा 1 आणि 2 मधील कामगिरी बद्दल आणि त्यामधील राहिलेल्या त्रुटी बाबत मार्गदर्शन केले तर येणाऱ्या 3.0 साठीच्या अभियानामध्ये कामगिरी कशी असेल, ऑनलाईन फिडिंग तसेच आपल्या महापालिका नगरपालिका तसेच नगरपंचायतकडून कशा पद्धतीने कामकाज करायचे याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. या प्रशिक्षणास जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी वैभव साबळे, मनपाचे आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्यासह जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत यांचे शहर समन्वयक अधिकारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.