Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधांसाठी 30 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधांसाठी 30 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी



सांगली, दि. 4,  : जिल्हास्तरावर सन 2022-23 मध्ये धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, अपंग शाळा, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी अल्पसंख्यांक विकास विभागाकडील  दि.  ऑक्टोबर 2015 च्या शासन निर्णयातील निकषांची पुर्तता करून  दि. 30 ऑगस्ट 2022 अखेर सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

या योजनेच्या अटी व शर्ती तसेच  अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली, दूरध्वनी क्रमांक 0233-2600525 येथे संपर्क साधावा.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.