Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबविणार - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबविणार  - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


  राज्य शासनामार्फत ९ ते १७ ऑगस्ट कालावधीत स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम


सांगली, दि. 18,  : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच राज्य शासनाच्या माध्यमतून स्वराज्य महोत्सव राबविण्यात येणार आहे.  जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात स्वातंत्र्य संग्रामतील अज्ञात नायक, क्रांतिकारक याचबरोबर स्वातंत्र्य संग्रामत घडलेल्या ‍विविध घटनांचे स्मरण व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये जनतेने आपले कर्तव्य समजून सक्रिय सहभाग नोंदवावा. त्याचबरोबर वाढत्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी कोरोनाचा दुसरा व प्रिकॉशन लस (बुस्टर डोस) घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्हाधिकारीऱ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वाराज्य व कोरोना लसीकरणाची माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगुले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील आदी उपस्थित होते.  

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त दिनांक १२ मार्च २०२१ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत "आजादी का अमृत महोत्सव" साजरा करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायम स्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने "आजादी का अमृत महोत्सव" अंतर्गत दि. ११ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये देशभरात हर घर तिरंगा" हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. राज्य शासनामार्फत ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. सांगली जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, विविध आस्थापना, दानशूर व्यक्ती, नागरिक या प्रत्येकांनी आपल्या घरावर, आस्थापनेवर  दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत  राष्ट्रध्वज फडकवावा त्याचबरोबर आपल्या इच्छेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रध्वज दान करावा, जेणेकरून जे लोक राष्ट्रध्वज खरेदी करू शकणार नाहीत त्यांना तो देण्यात येईल. सर्वांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आपले योगदान देवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी दि. ११ ते १७ ऑगस्ट २०२२ कालावधीत प्रत्येक शासकीय / निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरीकांना प्रोत्साहीत करावे. केंद्रिय गृह विभागाच्या दि. ३० डिसेंबर २०२१ रोजीच्या अधिसूचनेन्वये भारतीय ध्वज संहिता २००२ भाग-१ मधील परिच्छेद १.२ मधील राष्ट्रध्वज हे "हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर/सुत/सिल्क/खादी कापडापासून बनविलेला असेल", या तरतूदीमध्ये बदल करण्यात आला असून सदर बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सुत / पॉलिस्टर/ लोकर/ सिल्क/खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत असा उल्लेख केला आहे. या बदललेल्या तरतूदीनुसार तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल. भारतीय ध्वज संहितेचे पालन व्हावे व जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी असे आवाहन केले. 

शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कमीत कमी पाच राष्ट्रध्वज प्रत्येकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दान स्वरूपात सुपूर्द करावेत. विविध आस्थापना, सामाजिक संस्था यांनीही यामध्ये पुढाकार घेवून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करावेत, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, ज्या आस्थापना स्वत:हून त्यांच्या क्षेत्रात राष्ट्रध्वज लोकांना देवू इच्छितात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्याबाबतची अगोदर सूचना देवून वाटप करावे. जेणेकरून योग्य समन्वय साधून गरजू लोकांना राष्ट्रध्वजाचे वाटप होईल. राष्ट्रध्वज हा एक फूट x दीड फूट किंवा दोन फूट x तीन फूट आकारात असावा. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखून त्याचा अवमान होणार नाही याची खबरदारी प्रत्येकांनी घ्यावी. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या उपक्रमात सर्वांनी हिरीहिरीने सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनामार्फतही जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर स्वराज्य महोत्सव दिनांक 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार असून त्याबाबतही संबंधित विभागांनी तयारी करावी, असे आदेश देवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, स्वराज्य महोत्सवाअंतर्गत जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण करण्यात यावे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विशेष सभांचे आयोजन करणे, जिल्ह्याच्या ठिकाणी तिरंगा बलून सोडणे, जिल्ह्यातील अनाम वीर स्वातंत्र्य चळवळतील हुतात्मे यांचे दुर्मिळ फोटो व त्यांच्या कार्याची माहिती गावातील रस्त्याच्या कडेला लावण्याबाबत नियोजन करावे. तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी शासनाच्या सूचनाप्रमाणे उंच राष्ट्रध्वज उभारण्याबाबत संबंधित विभागांनी कार्यवाही करण्यात येणार आहे.  असे सांगून ते पुढे म्हणाले, जिल्ह्यामध्ये विविध स्पर्धांचे यामध्ये प्रामुख्याने निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येईल. जिल्ह्यातील एैतिहासीक वारसा स्थळा ठिकाणी पदयात्रांचे आयोजन त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. तसेच महत्वाच्या स्थळांची स्वच्छता मोहिम तसेच तालुका, जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याबाबत त्यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुसरा डोस, प्रिकॉशन डोस (बुस्टर डोस) मधील अंतर कमी करुन सहा महिने किंवा 26 आठवड्याचा कालावधी करण्यात आला आहे. 18 वर्षावरील सर्व नागरिकांना जिल्ह्यात 30 सप्टेंबर 2022 पर्यंत हा बुस्टर डोस मोफत देण्यात येणार आहे.  त्यामुळे सांगलीतील पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा. जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये 8 लाख 38 हजार 427 तसेच शहरी भागामधील 2 लाख 93 हजार 991 असे 11 लाख 32 हजार 818 बुस्टर डोस साठी पात्र लाभार्थी आहेत. या सर्वांनी बुस्टर डोस घ्यावा यासाठी जिल्ह्यात अतिरिक्त 275 लसीकरण केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. याठिकाणी लसीचा साठा, लस टोचक व मनुष्यबळ उपलब्ध आहे. जिल्ह्यामध्ये शासकीय आरोग्य संस्थांपैकी 64 प्राथमिक आरोग्य केंद्र, 12 ग्रामीण रुग्णालये, 3 उपजिल्हा रुग्णालये, 345 उपकेंद्रे, 14 नागरी आरोग्य केंद्रामध्ये कोव्हिड-19 लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. माहे ऑगस्टमध्ये गणेश उत्सव सुरु होत असून गावांगावांमध्ये उत्सव काळात कोव्हिड - 19 लसीकरण शिबिरांचे आयोजन गणेश मंडळांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. 

आरोग्य विभागाच्या मार्फत सांगली जिल्हा परिषद येथे 3 कॉल सेंटर सुरु करण्यात आले असून यामध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कॉल सेंटर मार्फत कोविन पोर्टलवरील पात्र लाभार्थ्यांचा यादीनूसार कॉल करुन लसीकरण घेतल्याबाबत पाठपुरावा करुन लाभार्थ्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. तसेच लसीकरणाबाबत शंका निरसन करण्यासाठी 0233-2374900 या स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला असून नागरिकांनी सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायं 5 या वेळेत फोन करुन कोव्हिड लसीकरणाबाबत अद्यावत माहिती व शंका निरसणचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.