Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'हृदयात राम अन् हाताला काम असं आमचं हिंदुत्व'; शिवसेनेचा आज वर्धापन दिन

'हृदयात राम अन् हाताला काम असं आमचं हिंदुत्व'; शिवसेनेचा आज वर्धापन दिन


मुंबई : शिवसेनेचा आज 56वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. मात्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील हॉटेल वेस्ट इनमध्ये मुक्कामी आहेत. याच ठिकाणी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे सेलिब्रेशन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विधानपरिषद निवडणूक आणि वाढत्या करोना रुग्णांमुळे मुख्यमंत्री ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान शिवसेनेकडून आजच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या तिघांच्या भाषणाची एक एक वाक्य दिली आहेत. यात हिंदुत्व आणि भगव्याचं राजकारण यावर भाष्य करण्यात आले. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वेस्ट इन हॉटेलमध्ये शिवसेनेकडून वर्धापन दिनाचे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. पक्षनिष्ठा आणि आपुलकीने पक्षाला भक्कम करणाऱ्या तमाम निष्ठावंत शिवसैनिकांना ५६ व्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा, अशा शब्दात शिवसैनिकांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

यावर्षीही शिवसेनेचा वर्धापन दिन ऑनलाईन साजरा होणार आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीमुळे सर्व आमदार आणि महत्वाचे पदाधिकारी एकाच हॉटेलमध्ये आहेत. त्यात कोरोना डोकं वर काढत असल्यामुळे हा मेळावा ऑनलाईन होणार आहे. राज्यसभेनंतर होणाऱ्या विधान परिषद आणि महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा मेळावा महत्वाचा मानला जात आहे. राज्यसभा निवडणुकीतील पराभव आणि उद्या होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय कानमंत्र देणार याकडं लक्ष लागलं आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.