Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बंदी असणाऱ्या प्लास्टिकचा साठा व विक्री करणाऱ्यावर महापालिका करणार कारवाई

बंदी असणाऱ्या प्लास्टिकचा साठा व विक्री करणाऱ्यावर महापालिका करणार कारवाई


बंदी असणाऱ्या प्लास्टिकचा साठा व विक्री करणाऱ्यावर महापालिका करणार कारवाई : प्रभाग निहाय 20 पथके तर 4 भरारी पथकांची नियुक्ती : प्लास्टिक साठा आढळल्यास कायदेशीर कारवाई बरोबर दंडात्मक कारवाई होणार: आयुक्त नितीन कापडणीस यांचा इशारा


सांगली : पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या आणि शासनाकडून बंदी असणाऱ्या प्लास्टिकचा साठा व विक्री करणाऱ्यावर महापालिका कडक कारवाई करणार आहे. यासाठी वॉर्ड निहाय 20 पथके तर 4 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रीसाठी किंवा प्लास्टिक साठा आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाईबरोबर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.

पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात सिंगल युज प्लास्टिक विक्री आणि साठा करणाऱ्यांवर महापालिकेने यापूर्वी कडक कारवाई करीत दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई सुद्धा केली आहे. 5 जून पासून सिंगल युज प्लास्टिक वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.  त्यामुळे बंदी असणारे सिंगल युज प्लास्टिक पिशव्या विक्री करण्यास आणि साठा करून ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

त्यामुळे शासनाच्या या निर्णयानुसार त्याची कडक अंमलबजावणी महापालिका क्षेत्रात केली जात आहे. या पूर्वीही महापालिकेकडून नियमितपणे प्लास्टिक वापर आणि साठा करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्याचपद्धतीने ही कारवाई अधिक कडक करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक वॉर्डात एक असे वीस पथके आणि प्रभाग निहाय चार पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके सिंगल युज प्लास्टिक वापर होत असणाऱ्या ठिकाणी जाऊन कारवाई करणार आहे शिवाय जे व्यावसायीक सिंगल युज प्लास्टिक वापरतील किना साठा करतील अशा दुकानदार किंवा विक्रेत्यांवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे. 

पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी सिंगल युज प्लास्टिकचा वापर थांबवणे गरजेचे आहे. त्यामुळे प्लास्टिक विक्री वापर आणि साठा करणाऱ्यांवर महापालिका यापुढे कडक कारवाई करणार आहे. त्यामुळे जे व्यवसायिक, विक्रते सिंगल युज प्लास्टिकची विक्री किंवा वापर करतील त्यांच्यावर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा ही आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.