जुनी धामणी येथे राष्ट्रीय जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाईप लाईन कामास सुरुवात आमदार सुधीरदादा गाडगीळ....
सांगली शनिवार 4 जून 2022 :- सांगली विधानसभा क्षेत्रातील जुनी धामणी येथे राष्ट्रीय जल जीवन मिशन अंतर्गत नवीन नळ पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषद पाणी पुरवठा यांच्या माध्यमातून 65 लाख मंजूर करण्यात आले यामध्ये संपूर्ण गावातील नवीन पाईप लाईन करणे खोदाई कामाचे भूमिपूजन आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले तसेच गावातील सरपंच व नागरिकांना गावातील नवीन पाईपलाईन टाकल्यानंतर संपूर्ण रस्ते खराब होणार आहेत तरी हे संपूर्ण रस्ते आमदार फंडातून करून देण्याचे आश्वासन यावेळी दिले, सदर कार्यक्रमास भाजपा प्रदेश सदस्य शेखर इनामदार, सरपंच ज्योतीताई सचिन कोळी, उपसरपंच रायबा तानाजी कोळी, माजी सरपंच गणपती कोळी, माजी सरपंच प्रधान सुर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य बाबासो पाटील, विनोद सुर्यवंशी, नंदाताई सुर्यवंशी, कविताताई कोळी, रूपालीताई कोळी.
ग्रामस्थ सुभाष पाटील, अभय भबीरे, कपिल सुर्यवंशी, धिरज पाटील, विजय सुर्यवंशी, जगदीश कोळी, सचिन कोळी, संतोष कोळी, योगेश कोळी, प्रकाश चौगुल, प्रशांत दोडमणी, शांतीनाथ पाटील, बाबासो कोळी, शितल मगदूम. गणपती साळुंखे, ग्रामसेवक विनायक गुळवे यांचे सह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.