Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली मध्ये माध्यमिक शिक्षणसंस्थांनी निलंबित शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे व कक्ष अधिकारी सोनवणे यांच्या सहाय्याने ८०ते १०० कोटींचा घोटाळा केला

सांगली मध्ये शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे व कक्ष अधिकारी सोनवणे यांच्या सहाय्याने  ८०ते १०० कोटींचा घोटाळा केला 



सांगली जिल्हा मध्ये माध्यमिक शिक्षणसंस्थांनी निलंबित शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे व कक्ष अधिकारी सोनवणे यांच्या सहाय्याने  ८०ते १०० कोटींचा घोटाळा केला 

बेकायदेशीरपणे शिक्षणसंस्था व निलंबित शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे व कक्ष अधिकारी सोनवणे यांनी संगनमताने मंजुर केलेले वैयक्तिक मान्यता प्रस्तावाच्या चौकशी च्या मागणीसाठी  उपसंचालक महेश चोथे  कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले.  निलंबित शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे व कक्ष अधिकारी सोनवणे नुकतेच लाच घेताना रंगेहात सापडले आहेत. त्याचप्रमाणे या दोघांनी सांगली जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागात मोठा भष्ठाचार केला आहे. माध्यमिकशिक्षण संस्थाचालकांच्या बरोबर संगणमत करून सव्वा तीनशे ते साडेतीनशे बेकायदेशीर पणे वैयक्तिक मान्यता प्रस्ताव मंजूर केले आहे.लाच देऊन एवढ्याच लोकांनी नोकरी मिळवली आहे. 


 

गरीब सर्वसामान्य शिक्षकव  इतर तेर उमेदवारांवर मोठा अन्याय केला आहे.सदर वैयक्तिक मान्यता प्रस्तावात जोडलेली कागदपत्र ही बोगस आहेत हे सर्व माहीत असुनही नियोजित पणे संगनमताने शिक्षणसंस्थाचालकांच्या बरोबर कटकारस्थान करून  उमेदवारांच्या कडून 80 ते 100 कोटी रुपये घेऊन मोठा भ्रष्टाचार केला आहे व शासनाची फसवणूक केली आहे तरी या वैयक्तिक मान्यता प्रस्ता्वाच्या कागदपत्रांची व त्यांच्या सत्यतेची सखोल चौकशी करावी चौकशी अंती बेकायदेशीर पणे मंजूर केलेले वैयक्तिक मान्यता रद्द कराव्यात . दोषी शिक्षणसंस्था व निलंबित शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे व कक्ष अधिकारी सोनवणे यांच्या वर योग्य ती कडक फौजदारी कारवाई करावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हा वतीने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला यावेळी भाजप ओबीसी युवा अध्यक्ष राहुल माने, बबलु आलमेल उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.