Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उदयनराजे संतापले, जाहीर कार्यक्रमात दिली संजय राऊतांना धमकी

 उदयनराजे संतापले, जाहीर कार्यक्रमात दिली संजय राऊतांना धमकी


सातारा, 09 जून : 'संजय राऊत यांना त्याचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन' असं म्हणत भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जाहीर कार्यक्रमातून धमकी दिली आहे. उदयराजे यांच्या धमकीमुळे कार्यक्रमात एकच खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील कार्यक्रम संपल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती घराण्याबाबत एक सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला होता. या पोस्टवर भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र महाराष्ट्र केसरी मधील विजेत्यांचा सत्कार करताना उदयनराजे संजय राऊत यांच्यावर चांगलेच भडकले.

'संजय राऊत यांना त्याचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन' अशी धमकीच उदयनराजे यांनी स्टेजवरून दिली. आता या धमकीचे पडसाद मात्र राजकीय पटलावर चांगलेच उमटतील असे दिसत असून यावर संजय राऊत नेमकी काय भुमिका घेतात याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे.रम्यान, महाराष्ट्र केसरी पैहलवान पृथ्वीराज पाटील, उप विजेता प्रकाश बनकर यांचा आणि इतर पदकातील पैलवानांचा सत्काराचा कार्यक्रम आज भाजप नेते खा उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी उदयनराजेंच्या हस्ते पै पृथ्वीराज पाटील यांना बुलेट देण्यात आली. तर प्रकाश बनकर यांना होंडा युनिकॉन ही गाडी देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला. साताऱ्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साताऱ्यात संपन्न झाल्यानंतर उदयनराजे मित्र परिवाराकडून ही बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. या बक्षिसाचा कार्यक्रम आज तीन महिन्यानंतर उदयनाराजेंच्या जलमंदिरात घेण्यात आला होता. या झालेल्या कार्यक्रमात उदयनराजे यांच्या हस्ते साताऱ्याचे कंदी पेढेही भरवण्यात आले. जी बुलेट पैलवान पृथ्वीराज पाटील यांना देण्यात आली. त्या गाडीला 007 हा खास नंबर उदयनराजेंनी घेऊन दिला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.